Team India | Women's T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट

Women's T20 World Cup: निराश नका होऊ! टीम इंडिया अजूनही Semi Final ला जाणार; दुसऱ्या पराभवानंतर वाचा कसं आहे गणित

India Qualification Scenarios for Women's T20 World Cup Semifinal: महिला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या षटकात पराभूत व्हावं लागलं. पण असं असलं तरी अद्याप भारताचे आव्हान संपले नसून अजूनही उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी आहे.

Pranali Kodre

Women's T20I World Cup 2024: रविवारी (१३ ऑक्टोबर) महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाला अखेरच्या साखळी सामन्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. शारजाहतील क्रिकेट स्टेडियममध्ये विक्रमी १५२ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलं होतं.

महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये शारजाहच्या मैदानात कोणत्याही संघाने दिलेलं हे सर्वात मोठं आव्हान होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला २० षटकात ९ बाद १४२ धावाच करता आल्या. त्यामुळे या स्पर्धेत भारताला दुसरा पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या विजयामुळे ए ग्रुपमध्ये चारही सामने जिंकून ८ गुणांसह अव्वल स्थान पक्के केले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील स्थानही पक्के केले आहे. मात्र, भारतासमोरील अडचणी आता वाढल्या आहेत.

पण चांगली गोष्ट अशी की जरी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी अद्याप त्यांचे आव्हान संपलेले नाही. अजूनही भारताला उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी आहे.

भारतासमोर कसे आहे समीकरण?

सध्या ऑस्ट्रेलिया ए ग्रुपमध्ये अव्वल स्थानी आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघ आहे. भारताने ४ पैकी दोन सामने जिंकलेत, तर दोन सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे भारताचे ४ गुण असून ०.३२२ नेट रन रेट आहे.

तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून त्यांचे ३ सामन्यांमधील दोन विजय आणि एका पराभवामुळे ४ गुण आहेत आणि ०.२८२ नेट रन रेट आहे. चौथ्या क्रमांकावरील पाकिस्तानने ३ सामन्यांपैकी दोन पराभव स्विकारले आहेत, तर एक विजय मिळवला आहे. त्यांचा -०.४८८ नेट रन रेट आहे. पाचव्या क्रमांकावरील श्रीलंकेने चारही सामने गमावल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

म्हणजेच आता ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले असल्याने ए ग्रुपमधून आता आणखी एकच संघ उपांत्य फेरीत जाऊ शकतो.

आता या एका जागेसाठी भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात चुरस आहे. यातील भारताचे चारही साखळी सामने खेळून पूर्ण झालेत, तर न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात सोमवारी सामना होणार आहे. हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

आता जर भारताला उपांत्य फेरीत पोहचायचे असेल, तर हीच आशा करावी लागणार आहे की पाकिस्तान न्यूझीलंडला पराभूत करेल. जर असे झाले, तर भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या तिन्ही संघांचे ४ गुण होतील. पण भारताचा नेट रन रेट न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यापेक्षा चांगला आहे. त्यामुळे भारत उपांत्य फेरीत पोहचेल.

मात्र, जर न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभूत केले, तर मात्र न्यूझीलंड ६ गुणांसह भारताला मागे टाकत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करेल. जर असं झालं, तर भारताचे आव्हानही संपुष्टात येईल.

तसेच पाकिस्तानचं आव्हान सध्या जिवंत असलं तरी त्यांना उपांत्य फेरीत जाण्याची संधी अगदीच कमी आहे. जर त्यांना उपांत्य फेरीत जायचं असेल, तर न्यूझीलंडविरुद्ध खूपच मोठा विजय मिळवावा लागेल, ज्यामुळे भारतापेक्षा त्यांचा नेट रन रेट चांगला होईल. मात्र, हे जवळपास अशक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT