shahid afridi esakal
क्रिकेट

Pakistan Cricket: 'बाबर, शाहीन, नसीमला संघाबाहेर केलं ते योग्यच', असं का म्हणाला शाहिद आफ्रिदी, वाचा

PAK vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम, शाहिन आफ्रिदी आणि नसीम शाहला संघातून वगळले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shahid Afridi on Pakistan Test Squad Changes : इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानने संघात बदल केला आहे. पाकिस्तानच्या नवनियुक्त निवड समितीने माजी कर्णधार बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी व नसीम शहा यांना संघातून वगळले आहे. निवड समितीच्या या निर्णयाचे माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने समर्थन केले आहे.

माजी पीबीसी निवडकर्ता शाहीद आफ्रिदी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "बाबर, शाहीन आणि नसीम यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक देण्याच्या निवडकर्त्यांच्या निर्णयाचे मी समर्थन करत आहे. हा निर्णय केवळ या चॅम्पियन खेळाडूंच्या करिअरचे संरक्षण आणि विस्तार करण्यास मदत करत नाही तर भविष्यासाठी मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करतो. यामुळे उदयोन्मुख खेळाडूंची चाचणी घेण्याची उत्तम संधी मिळत आहे."

माजी कर्णधार बाबर आझम गेल्या काही महिन्यांपासून आपल्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. नुकताच त्याने खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्याने २०२२ पासून कसोटीत एकही शतक केलेलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही केवळ त्याने ३० आणि ५ धावांची खेळी केली होती. या खराब कामगिरीमुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर आता त्याला संघातून वगळण्यात आले आहे. तसेच शाहीन आणि नसीम यांनाही गोलंदाजीतील सततच्या खराब कामगीरीमुळे संघात स्थान देण्यात आलेले नाही.

पाकिस्तानने मागील आठवड्यात निवड समितीच्या पॅनलमध्ये बदल केले. माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने राष्ट्रीय निवड समितीच्या निवडकर्ता पदाचा राजीनामा दिल्यानंतर निवड समितीवर नव्या सभासदांना नियुक्त करण्यात आले. ज्यामधील महत्वाचे नाव म्हणजे अलीम दार. अलीम दार हे गेली २० वर्ष आयसीसी पंच म्हणून कार्यरत आहेत. दार यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय अंपायरिंगमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांची पीबीसी निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली. दार यांच्यासह माजी कसोटीपटू आकिब जावेद,अझहर अली, हसन चीमा, यांनाही समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT