Gautam Gambhir KKR Team India Coach  esakal
क्रिकेट

Gautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होण्यात SRK निभावणार महत्वाची भुमिका?

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir KKR Team India Coach : राहुल द्रविडनंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याच्या रेसमध्ये सध्या केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर सर्वात आघाडीवर आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ टी 20 वर्ल्डकपनंतर संपुष्टात येत आहे. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले आहेत.

बीसीसीआयने गौतम गंभीरसह अजून काही नावांशी संपर्क साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने काही परदेशी प्रशिक्षकांशाही संपर्क केला आहे. यात रिकी पाँटिंगचे नाव आघाडीवर आहे.

मात्र बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. बीसीसीआयने रिकी पाँटिंग आणि दुसऱ्या कोणत्याही ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाशी संपर्क केला नसल्याचे सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने गौतम गंभीरकडे अजून प्रशिक्षक पद स्विकारण्याचा अधिकृत प्रस्ताव पाठवलेला नाही. गौतम गंभीर बीसीसीआयकडून प्रस्ताव आला तर तो स्विकारण्यात मागेपुढे पाहणार नाही असं देखील सूत्रांकडून कळत आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार गौतम गंभीर हा असा व्यक्ती आहे जो आव्हानांचा मुकाबला करण्यास मागेपुढे पाहत नाही. गंभीर सध्या केकेआरचा मेंटॉर आहे आणि त्यावर त्यानं सर्व लक्ष केंद्रित केलं आहे. दोनवेळा आयपीएल जिंकणारी केकेआर रविवारी सनराईजर्स हैदराबादसोबत आयपीएल 2024 ची फायनल खेळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केकेआर गंभीरला या हंगामानंतर टीम इंडियाचा कोच होण्यासाठी जाऊ देणार की नाही याबाबत काही खुलासा झालेला नाही. फ्रेंचायजीचा सहमालक शाहरूख खान या सर्व प्रक्रियेत महत्वाची भुमिका बजावणार आहे. गंभीरच्या अंतिम निर्णयात शाहरूख खानचा मोठा वाटा असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शाहरूख खान आणि गंभीर यांच्यातील वैयक्तिक चर्चेत गंभीरचा अंतिम निर्णय हा शाहरूखसोबत चर्चा करूनच घेतला जाईल. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने आयपीएलची फायनल गाठली आहे.

खेळाडू आणि कर्णधार म्हणून त्यानं 2011 आणि 2017 मध्ये केकेआरला विजेतेपद पटकावून दिलं आहे. याचबरोबर 2014 च्या चॅम्पियन्स लीगमध्ये देखील केकेआरने गंभीरच्या नेतृत्वाखालीच फायनल गाठली होती.

गंभीर हा 2007 आणि 2011 च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा देखील भाग होता. त्याने दोन्ही वर्ल्डकपमध्ये भारताच्या विजयात मोठी भुमिका बजावली होती.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'या' शिल्पकाराने घडवलाय राहुल गांधींनी अनावरण केलेला कोल्हापुरातील शिवरायांचा पुतळा; जाणून घ्या रायगड कनेक्शन

ती कुठेय? सगळे आले पण ती नाही दिसली, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहून नेटकरी करतायत तिची चौकशी

Bigg Boss Marathi 5 : सूरज की निक्की कोण आहे व्होटिंग ट्रेंड्समध्ये आघाडीवर ? घ्या जाणून या सीजनचे फायनल वोटिंग ट्रेंड्स

Used Car Buying Tips: सणासुदीत रिसेल कार खरेदी करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही फसवणूक

Latest Marathi News Live Updates : वीज दरवाढीचा व्यावसायिकांना ‘शॉक’; प्रतियुनिट 2 रुपये कमी करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT