Shreyas Iyer with his mother Rohini Iyer Sakal
क्रिकेट

Shreyas Iyer अन् त्याच्या आईने मुंबईत खरेदी केलं तब्बल २.९० कोटी रुपयांचं अपार्टमेंट!

Pranali Kodre

Shreyas Iyer Buys Crore-Worthy Apartment in Mumbai: श्रेयस अय्यर भारताच्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याचीदेखील चांगली ब्रँड व्हॅल्यू असून तो क्रिकेटव्यतिरिक्त जाहिरातींमधून पण मोठ्याप्रामाणात कमाई करतो.

आता नुकतेच असे समोर आले आहे की श्रेयस आणि त्याची आई रोहिणी अय्यर यांनी मुंबईतील वरळीमध्ये झीपकीद्वारे मालमत्ता नोंदणी केलेल्या कागदपत्रांनुसार तब्बल २.९० कोटी रुपयांचे एक अपार्टमेंट खरेदी केले आहे.

हे अपार्टमेंट ५२५ स्क्वेअर फूटचा असून वरळीतील आदर्श नगर भागात असून त्रिवेणी इंडस्ट्रीयल सीएचएसलमधील दुसऱ्या मजल्यावर आहे. त्याने ५५, २३८ रुपये प्रति स्क्वेअर फूट अशा किंमतीने हे अपार्टमेंट खरेदी केले आहे.

दरम्यान, या अपार्टमेंट खरेदीच्या व्यवहाराची नोंदणी १९ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आली असून ज्यासाठी स्टॅम्प ड्युटीचे १७.४० लाख रुपये त्याने भरले, तर ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले होते, असे कागदपत्रांवरून कळत आहे.

दरम्यान, श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच मुंबईत जागा खरेदी केलेली नाही. त्याने मुंबईतील उंच इमारतींपैकी एक असलेल्या लोढा वर्ल्ड टॉवर्समध्येही घर घेतलेले आहे. त्याने २०२० मध्ये २३८० स्क्वेअर फूटचे अपार्टमेंट खरेदी केले होते.

त्याचे हे अपार्टमेंट ४८ व्या मजल्यावर असून त्याची किंमत ४९,८१७ प्रति स्क्वेअर फूट होती. तसेच या अपार्टमेंटला ३ कारचे पार्किंग देखील आहे.

इतकेच नाही, तर काही मिडिया रिपोर्ट्सनुसार जुलै २०२४ मध्ये श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीमध्येच २.९ कोटी रुपयांना एक कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली होती.

वरळी हा भाग मुंबईच्या मधोमध असल्याने तिथे प्रॉपर्टी करण्यासाठी अनेक खेळाडूंचा कल दिसून आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobikwik IPO: मोबिक्विकला ७०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीची मान्यता

Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण; थांबे, तिकीट अन् मार्ग.. जाणून घ्या सर्वकाही

Kannad Crime : फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीं-विद्यार्थींनींना सहा गुंडाकडून रस्त्यावर दगडी फरशीने मारहाण; रिक्षा चालक आरोपी ताब्यात, पाच जण फरार

Warning Pune: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं फुल्ल; नदीपात्रात होणार विसर्ग

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

SCROLL FOR NEXT