sarfaraz khan esakal
क्रिकेट

Sarfaraz Khan : इराणी चषक लढतीत द्विशतक, तरीही सर्फराज खान मुंबईच्या रणजी संघातून बाहेर; जाणून घ्या कारण

Sarfaraz Khan : शेष भारताविरुद्ध इराणी चषकाच्या लढतीत सर्फराज खानने द्विशतक झळकावून मुंबईचा पाया भक्कम केला होता. पण, रणजी करंडक २०२४-२५ स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात सर्फराजचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Swadesh Ghanekar

No return for Shreyas Iyer in Indian Test Team : धडाकेबाज फलंदाज सर्फराज खान ( Sarfaraz Khan) याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आक्रमक खेळीने मैदान गाजवले आहे. इराणी चषकाच्या लढतीत मुंबईचा संघ अडचणीत असताना सर्फराजने नाबाद २२२ धावांची खेळी करून शेष भारताच्या गोलंदाजांना झोडले. आता मुंबईचा संघ रणजी करंडक स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्यासाठी २०२४-२५ च्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. पण, मुंबईने जाहीर केलेल्या संघात सर्फराज खानचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

गतविजेत्या रणजी करंडक स्पर्धेत मुंबईला ११ ऑक्टोबरला बदोडा संघाचा सामना करायचा आहे आणि मुंबईने पहिल्या दोन सामन्यांसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्फराज राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. १८ ऑक्टोबरला मुंबईचा मुकाबला महाराष्ट्र संघाशी होणार आहे. त्याआधी १६ ऑक्टोबरपासून भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिली कसोटी बंगळुरू येथे खेळवली जाणार आहे. सर्फराजची न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तो मुंबईचा रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्या व दुसऱ्या सामन्याला मुकण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, इराणी चषक जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाला मुंबई क्रिकेट असोसिएशनने १ कोटी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने इराणी चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि २७ वर्षांचा दुष्काळ संपवला. बीसीसीआयने विजयी संघाला ५० लाख बक्षीस जाहीर केले होते. श्रेयस अय्यरचा मुंबईच्या संघात समावेश केला गेल्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

मुंबईचा संघ – अजिंक्य रहाणे ( कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुयंश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अधात्राव, शॅम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रोस्टन डाएस,  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT