Rohit Sharma | Shreyas Iyer Sakal
क्रिकेट

Video: दिलदार श्रेयस अय्यर! रोहितला पाहाताच दिली स्वत:ची खुर्ची अन् मग कर्णधारानंही थोपटली पाठ

Pranali Kodre

Shreyas Iyer Shows Respect to Rohit Sharma: CEAT क्रिकेट रेटिंग (CCR) २६व्या पुरस्कार सोहळा मुंबईत बुधवारी (२१ ऑगस्ट) पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना सन्मान करण्यात आला. भारताचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. दरम्यान पुरस्कार सोहळा सुरू होण्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज श्रेयस अय्यर यांच्यातील झालेल्या संवादाने अनेकांचे लक्ष वेधले. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

झाले असे की सर्वजण बसलेले असताना रोहित शर्मा हॉलमध्ये आला. त्यावेळी तो त्याच्यासाठी जागा पाहात होता, याचवेळी दुसऱ्या रांगेत बसलेल्या श्रेयस अय्यरने लगेचच उठला आणि त्याला आदर देत त्याच्या जागेवर बसायला सांगितल्याचे दिसले.

त्यावेळी रोहितनेही त्याला एक छान हास्य देत त्याच्या पाठीवर थाप दिली. यानंतर त्याने श्रेयसची ऑफर नाकारली नाही आणि तो तिथे बसला. यानंतर अय्यरही त्याच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला.

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात रोहित शर्माचा या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला. त्याची या वर्षातील कामगिरी चांगली झाली आहे.

याशिवाय त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धाही जिंकली. याव्यतिरिक्त विराट कोहलीला सर्वोत्तम वनडे फलंदाज, तर मोहम्मद शमीला सर्वोत्तम वनडे गोलंदाज पुरस्कार मिळाला.

यशस्वी जैस्वाल आणि आर अश्विन यांना अनुक्रमे सर्वोत्तम कसोटी फलंदाज आणि गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आले. श्रेयस अय्यरलाही उत्कृष्ट टी२० नेतृत्वाचा पुरस्कार मिळाला. त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या कोणत्या परिसरात किती कोसळला?

Pune Rain: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर

Rain News: धो धो पावसामुळे टॅक्सीवाले मालामाल; अतिरिक्त भाडे आकारत चाकरमान्यांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

Changes in Transportation : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त असे असतील शहरातील वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT