Shubham Khajuria esakal
क्रिकेट

Ranji Trophy 2024: जम्मूचा शुभम महाराष्ट्रावर पडतोय भारी; एकट्याने डाव उभारला अन् ठोकले दणदणीत द्विशतक

Maharashtra Firts Match in Ranji Trophy: महाराष्ट्र संघ जम्मू आणि काश्मीर विरूद्ध रणजी रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना खेळत असून जम्मू आणि काश्मीर संघाने आत्तापर्यंत ४२६ धावा उभारल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra vs Jammu & Kashmir: कालपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात झाली असून महाराष्ट्र आपला पहिला सामना जम्मू आणि काश्मीर विरूद्ध खेळत आहे. जम्मू आणि काश्मीर संघ पहिल्या डावात ४४९ धावांवरती खेळत आहे तर जम्मूचा फलंदाज शुभम खजुरीयाने महाराष्ट्रातील गोलंदाजांना नमवले आहे. सलामीसाठी आलेल्या शुभमने डावात दणदणीत द्विशतक झळकावले. आत्तापर्यंत महाराष्ट्राने जम्मू आणि काश्मीर संघाचे ५ फलंदाज बाद केले. परंतु सलामीवीर शुभमला रोखण्यात महाराष्ट्राच्या गोलंदाजांना यश आले नाही.

नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्याच षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर सलामीवीर अभीनव पुरीला बाद करून महाराष्ट्राने जम्मू आणि काश्मीर संघाला पहिला धक्का दिला. नंतरच्या चारही खेळाडूंना महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. परंतु शुभम खजुरीयाने संघाची एक बाजू लावून धरली आणि खेळत राहीला. शुभमला या खेळीदरम्यान ५ खेळाडूंची साथ मिळाली. ज्यामध्ये शुभम शुभम पुंडीर (३७), कर्णधार पारस डोग्रा (३०), अब्दुल शामद (२३), साहिल लोत्रा (१८) यांनी योगदान दिले. तर शिवांश शर्मा अर्धशतक झळकावून ७२ धावांवर नाबाद आहे.

शुभम ३५२ चेंडूत २५५ धावांवर नाबाद आहे. या खेळीदरम्यान त्याने २९ चौकार व ८ षटकार ठोकले. दुसऱ्या दिवसाच्या मध्यंतरापर्यंत जम्मू आणि काश्मीर संघाने ५ विकेट्स गमावत तब्बल ४४९ धावा उभारल्या आहेत.

मुंबईविरूद्ध बरोडा

गतविजेता मुंबई संघ आपला पहिला सामना बरोड्याविरूद्ध खेळत असून बरोडा संघाने पहिल्या डावात २९० धावा उभारल्या आहेत. प्रत्युत्तरात मुंबई संघ ५ विकेट्स गमावत १६३ धावांवर खेळत आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ अवघ्या ७ धावा करून माघारी परतला, तर दुसरा सलामीवीर आयुष म्हात्रेने (५२) अर्धशतक झळकाले. यष्टीरक्षक हार्दीक तामोरेने (४०) व कर्णधार अजिंक्य रहाणेने (२९) धावांचे योगदान दिले. परंतु श्रेयश अय्यरच्या खात्यात मात्र भोपळा पडला. तर, सिद्धेश लाड(३) व शम्स मुलानी (१६) धावांवर नाबाद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT