Shubman Gill Sakal
क्रिकेट

IND vs BAN: ऋषभ पंत अन् Shubman Gill यांचा शतकी धमाका; भारताने ४ बाद २८७ धावांवर केला डाव घोषित

Pranali Kodre

India vs Bangladesh 1st Test: भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेची सुरुवात झाली असून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व ठेवलं असून तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत पाठोपाठ भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलनेही शतकाला गवसणी घातली आहे.

भारताने ६४ षटकात ४ बाद २८७ धावांवर दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे पहिल्या डावातील २२७ धावांच्या आघाडीमुळे भारताने आता बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात दुसऱ्या डावात भारताने ६७ धावांवरच ३ विकेट्स गमावल्या होत्या, यात रोहित शर्मा (५), यशस्वी जैस्वाल (१०) आणि विराट कोहली (१७) यांच्या विकेट्सचा समावेश होता. परंतु, त्यानंतर १६७ धावांची भागीदारी ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांच्यात झाली.

या भागीदारीदरम्यान पंतने त्याचे सहावे कसोटी शतकही पूर्ण केले. पण शतकानंतर तो बाद झाला. पंतने १२८ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांसह १०९ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर केएल राहुल फलंदाजीला आला. यावेळी त्याच्याबरोबर खेळत असताना गिलनेही त्याचे शतक पूर्ण केले. गिलचे हे पाचवे कसोटी शतक ठरले.

दरम्यान, या सामन्यात पहिल्या डावात गिलला भोपळाही फोडता आला नव्हता, पण दुसऱ्या डावात त्याने शतकी खेळी केली आहे. तो १७६ चेंडूत ११९ धावांवर नाबाद राहिला, या खेळीत त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले. डाव घोषित केला, तेव्हा केएल राहुल १९ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या.

दरम्यान, २०२४ मधील गिलचे हे तिसऱ्या क्रमांकावर खेळताना भारतातील तिसरे कसोटी शतक आहे. त्यामुळे तो एकाच वर्षात तीन कसोटी शतके तिसऱ्या क्रमांकावर मायदेशात करणारा भारताचा तिसराच फलंदाज आहे. यापूर्वी दिलीप वेंगसरकर यांनी १९७९ मध्ये असा कारनामा केला होता. त्यानंतर चेतेश्वर पुजाराने २०१२ आणि २०१६ साली असा कारनामा केला आहे.

या सामन्यात पहिल्या डावात भारताने ९१.२ षटकात सर्वबाद ३७६ धावा केल्या आहेत. भारताकडून आर अश्विनने ११३ धावांची शतकी खेळी केली, तर रविंद्र जडेजाने ८६ धावांची खेळी केली. तसेच यशस्वी जैस्वालने ५६ धावा केल्या. बांगलादेशकडून हसन मेहमुदने शानदार गोलंदाजी करताना ५ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर बांगलादेश संघाला केवळ १४९ धावाच करता आल्याने भारताने २२७ धावांची मोठी आघाडी मिळवली. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने ३२ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi CM Atishi: दिल्लीत आता आतिषी सरकार! मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी संपन्न; नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश? जाणून घ्या

Latest Marathi News Updates : हरियाणामध्ये काँग्रेस 60 अन् भाजप 20 जागा जिंकणार - सत्यपाल मलिक

मोदींकडून अवास्तव कौतुक; सेहवागच्या कर्मचाऱ्याला लाखोंचा भूर्दंड, विरुच्या ट्विटनं खळबळ

Bigg Boss Marathi 5 : "ती सगळं फुटेजसाठी करते" ; पत्रकारांसमोरच निक्की-जान्हवीचं वाजलं

Lebanon Pager Blast: वायनाडच्या शिंप्याचा मुलगा नॉर्वेत कसा पोहचला? का चर्चेत आहे जोस टेलर

SCROLL FOR NEXT