Shubman Gill Team India Captain  esakal
क्रिकेट

Shubman Gill : शुभमन गिल 'कॅप्टन' रोहितचा वारसदार मात्र.... माजी निवडसमिती सदस्याचा मोठा दावा

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill Team India Captain : जगज्जेत्या भारतीय संघाचा टी 20 वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष अजून सुरू असतानाच भारताची दुसरी टीम झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघ पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा 6 जुलैला होणार आहे.

वर्ल्डकप फायनल झाल्या झाल्या रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने टी 20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. आता या तिघांच्या रिप्लेसमेंटचा शोध संघ व्यवस्थापनाला घ्यायचा आहे. तसेच कर्णधार रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण हा देखील प्रश्न सोडवायचा आहे.

बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यावर शुभमन गिलच्या खांद्यावर कर्णधारापदाची धुरा दिली आहे. मात्र हे कर्णधारपद वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडू परतल्यानंतर कायम राहणार का प्रश्न आहे. अनेक चाहत्यांच्या मते उपकर्णधार हार्दिक पांड्या हा रोहितचा उत्तराधिकारी असेल.

दरम्यान, बीसीसीआयचे माजी निवडसमिती सदस्य साबा करीम यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'हार्दिकच होण्याची शक्यता आहे मात्र आताच निवडसमिती रोहितचा उत्तराधिकारी निवडेल असं म्हणणं खूप घाईचं होईल. संघात अनेक इच्छुक उमेदवार आहेत. हार्दिक पांड्या सध्या उपकर्णधार आहे. रोहितनंतर तोच संघाची धुरा सांभाळेल.'

साबा करीम पुढे म्हणाले की, 'मला असं वाटतं की भारतीय निवडसमिती सदस्य शुभमन गिलकडे ऑल फॉरमॅट प्लेअर म्हणून पाहत आहेत. याचबरोबर त्याच्याकडे नेतृत्व गुण असल्याचं देखील त्यांना जाणवत आहे. त्यामुळेच त्याला झिम्बब्वे दौऱ्यावर संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. गिल फलंदाजच नाही तर कर्णधार म्हणून या दौऱ्यावर कशी कामगिरी करतो हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे.'

शुभमन गिलला टी 20 वर्ल्डकप 2024 च्या संघात स्थान मिळालं नव्हतं. त्याचा स्टँड बाय खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता. डावखुऱ्या यशस्वी जयस्वालला टीम इंडियात संधी मिळाली होती. त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मात्र मिळाली नाही.

कोहली, रोहित आणि जडेच्या रिप्लेसमेंटबाबत करीम म्हणाले, 'या सर्वांच्या रिप्लेसमेंट अनेक आहेत. शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल किंवा अभिषेक शर्मा हे आहेत. सध्या तीन ते चार जागा ओपन आहेत. दोन सलामीवीर त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज यांची जागा रिकामी आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Latest Marathi News Updates : पुण्यात वंचितच्या नऊ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल...

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

SCROLL FOR NEXT