Shubman Gill  ESAKAL
क्रिकेट

Shubman Gill IND vs ENG : माझ्या मुलासाठी तिसरा क्रमांक योग्य नाही... गिलचे वडील निर्णयावर नाराज

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill Father India Vs England 5th Test : शुभमन गिलने जरी विझॅक कसोटीत शतक ठोकलं असलं तरी आणि पाचव्या कसोटीत 110 धावांची धमाकेदार खेळी केली असली तरी त्याच्या वडिलांना त्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळणं पसंत नाही.
मालिकेतील पिहल्या कसोटीत शुभमन गिलवर मोठा दबाव होता. त्याने गेल्या 12 डावात एकही अर्धशतकी खेळी केली नव्हती. तो त्याचा आक्रमक खेळ खेळू शकत नव्हता. तो हलक्या हाताने ने खेळता टाईट ग्रीपने खेळत होता.

गिलने विझॅकमध्ये दुसऱ्या डावात संघ अडचणीत असताना शतक ठोकत त्याच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आज धरमशालामध्ये अजून एक शतकी खेळी केली.

मात्र शुभमन गिलचे वडील आणि त्याचे पहिले कोच लखविंदर यांनी पीटीटआयला दिलेल्या माहितीनुसार, स्टेप आऊट होण्यानं मोठा फरक पडतो. त्याने ते बंद केलं होतं त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त दबाव येत होता.

तो 16 वर्षाचा असल्यापासून स्पिनर आणि वेगवान गोलंदाजांना देखील स्टेप आऊट होऊन खेळत होता. त्यामुळे चेंडूचा स्विंग आणि स्पिन काऊंटर होतो.

मात्र, त्याने विझाग कसोटीच्या दुसऱ्या डावात आपले पहिले शतक झळकावून आपल्या टीकाकारांना शांत केले. सलामीच्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरल्याने ही त्याची मोठी खेळी होती.

शुक्रवारी येथे स्लॉग स्वीपसह शुभमनला मालिकेतील दुसरे शतक झळकावताना पाहणाऱ्या त्याच्या वडिलांनी भारताच्या फलंदाजाला लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याची स्लाईड पकडण्यात मदत करणाऱ्या कारणांबद्दल सांगितले.

"बाहेर पडल्याने मोठा फरक पडला आहे, त्याने ते करणे थांबवले होते आणि त्यामुळे दबाव निर्माण झाला होता. त्याच्या अंडर-16 दिवसांपासून, तो फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांना तसेच चळवळ कमी करण्यासाठी बाहेर पडत आहे," लखविंदरने पीटीआयला सांगितले.

ते पुढे म्हणाले की, 'ज्यावेळी तुम्ही तुमचा नैसर्गिक खेळ करू शकत नाही त्यावेळी तुम्ही अडचणीत येता. सर्व खेळ हा आत्मविश्वासाचा आहे. तुम्हाला तुमची गाडी रूळावर आणायला फक्त एक इनिंग पुरेशी असते. गिल हा 16 वर्षाचा असल्यापासून शतकांचा रतीब घालतोय.'

गिलने आज जेम्स अँडरसनसकट सर्व गोलंदाजांविरूद्ध आक्रमक फलंदाजी केली. मात्र तरी देखील लखविंदर यांना गिलने सलामीला पुन्हा खेळण्यास सुरूवात करावे असं वाटतं.

लखविंदर हे मोहालीत शुभमन गिलला ट्रेनिंग देत असतात. ते गिलच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याच्या निर्णयाविरूद्ध आहेत.

ते म्हणाले की, 'त्याने पुन्हा सलामीला खेळायला हवं. हाच त्याच्यासाठी योग्य निर्णय असल्याचे मला वाटते. ज्यावेळी तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये जास्तवेळ बसून राहता त्यावेळी दबाव वाढतो. नंबर 3 चा फलंदाज हा ना सलामीवीर आहे ना मधल्या फळीतील फलंदाज.

गिलचा खेळ तसा नाहीये. ही जागा चेतेश्वर पुजारा सारख्या खेळाडूसाठी योग्य आहे. तो बचावात्मक खेळतो. ज्यावेळी चेंडू नवा असतो त्यावेळी तुम्हाला जास्त लूज बॉल मिळतात. मात्र जर तुम्ही 5 व्या आणि 7 व्या षटकानंतर आला तर चेंडूची चकाकी असेतच गोलंदाज देखील सेटल झालेला असतो.' असे असले तरी लखविंदर हे गिलच्या निर्णयाचा आदर करतात कारण आता त्यांचा मुलगा मोठा झाला आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT