Wanindu Hasaranga will miss the remainder of the ODI series SAKAL
क्रिकेट

IND vs SL : कर्णधार टेन्शनमध्ये! दुसऱ्या ODI सामन्यापूर्वीच संघाला मोठा धक्का! मॅच विनर खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर

SL vs IND Wanindu Hasaranga Ruled Out News : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka ODI series : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ३४ वर्षीय लेगस्पिनर जेफ्री वँडरसेचा संघात समावेश करण्यात आला आहे.

कोलंबो येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हसरंगाची कामगिरी चांगली होती. आधी त्याने बॅटने 24 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि नंतर गोलंदाजीसह आपले कौशल्य दाखवले आणि विराट कोहली आणि केएल राहुलच्या विकेट्ससह 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या.

भारताविरुद्धच्या मालिकेत दुखापतींमुळे श्रीलंकेचा संघ अडचणीत आला आहे. एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका आणि मथिशा पाथिराना हे बाहेर गेले होते. टी-20 मालिकेपूर्वी दुष्मंथा चमीरा आणि नुवान तुषारा यांनाही दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून बाहेर गेले होते.

सोशल मीडियावर माहिती देताना श्रीलंका क्रिकेटने लिहिले की, "पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, 10व्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकताना त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. यानंतर खेळाडूच्या एमआरआयमध्ये दुखापतीची पुष्टी झाली. हसरंगाच्या जागी जेफ्री वँडरसेचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला. उभय संघांमधील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (आज) कोलंबो येथे होणार आहे. श्रीलंकेचा संघ स्टार अष्टपैलू हसरंगाशिवाय असेल. 34 वर्षीय लेगस्पिनर जेफ्री वँडर्सेला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT