Smriti Mandhana gifted to a Young fan sakal
क्रिकेट

''मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय''; Smriti Mandhanaच्या कृतीचं जगभर कौतुक

Swadesh Ghanekar

Smriti Mandhana gifted to a Young fan : भारतीय महिला संघ सध्या आशिया चषक स्पर्धेसाठी श्रीलंकेत खेळतोय. पहिल्याच सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानला पराभूत केले. या सामन्यातील सलामीवीर स्मृती मानधना हिने सामन्यानंतर डंबुला येथील एका दिव्यांग मुलीला एक भारी गिफ्ट दिलं आणि तिच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या. स्मृतीच्या या कृतीचं जगभर कौतुक होत आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने हा व्हिडीओ त्यांच्या हँडलवर पोस्ट केला आहे.

स्मृतीने 'आदिशा' नावाच्या मुलीसोबत गप्पा मारल्या. तिला क्रिकेट आवडते का आणि सामन्याचा आनंद घेतला का, असा सवाल स्मृतीने तिला केला. स्मृतीने संपुर्ण टिमच्या वतीने आदिशाची भेट घेतली आणि तिला मोबाईल फोन गिफ्ट दिला. आदिशा हेराथचे क्रिकेटवरील प्रेम तिला स्टेडियममध्ये घेऊन आले. तिला स्मृती मानधना आवडते आणि तिची भेट झाल्याने आदिशा खूप आनंदित झाली.

"आम्ही अनपेक्षितपणे सामना पाहण्यासाठी आलो, माझ्या मुलीला मॅच पाहायची होती. आम्ही भारतीय संघातील स्मृती मॅडमला भेटलो आणि माझ्या मुलीला त्यांनी फोन गिफ्ट केला. हे अनपेक्षित होते. माझी मुलगी भाग्यवान आहे. मी खूप आनंदी आहे,'' असे आदिशाच्या आईने सांगितले.

सामन्याबद्दल...

प्रथम फलंदीजाला आलेल्या पाकिस्तान महिला संघाचा संपूर्ण डाव १९.२ षटकांत १०८ धावांवर आटोपला. दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर रेणुका सिंग, पुजा वस्त्राकर, श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. १०९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना शफाली वर्मा ( ४०) व स्मृती ( ४५) यांनी ९.३ षटकांत ८५ धावांची सलामी दिली. भारताने ही मॅच ३ बाद १०९ धावा करून जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT