Sri Lanka announce squad for ODI series against India sakal
क्रिकेट

SL vs IND : टी-20 मालिका संपली, आता रंगणार ODIचा थरार! जाणून घ्या वेळापत्रक अन् सर्वकाही...

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka squad ODI series : पूर्ण डावात श्रीलंकेच्या तोंडातून घास हिरावल्यानंतर भारतीयांनी सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली आणि मालिकेतील तिसरा टी-20 सामना जिंकला. ही मालिका भारताने 3-0 अशी जिंकली. आता यानंतर वनडे मालिका होणार आहे. ज्यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे.

आता वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये चरित असलंकाकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. श्रीलंकेचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री हरिन फर्नांडो यांनी संघाला मान्यता दिली आहे.

श्रीलंका संघाचा कर्णधार यापूर्वी कुलास मेंडिस होता. निवड समितीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेंडिसला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार बनवले होते. याआधी त्याने वनडे वर्ल्ड कपमधील काही सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्वही केले होते. आता त्याच्या जागी चरित असलंका यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

टी-20 मालिकेतही असलंका श्रीलंकेचा कर्णधार आहे. मेंडिसच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या संघाने 8 पैकी 6 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. मेंडिसच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला बांगलादेशविरुद्धची मालिका 2-1 अशी गमवावी लागली होती. कदाचित त्यामुळेच निवडकर्त्यांनी वेगळ्या दिशेने जाणे पसंत केले. आता 2 ऑगस्टपासून भारत विरुद्ध वनडे मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील सर्व सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील.

जुना कर्णधार कुसल मेंडिसला वनडे संघात कायम ठेवण्यात आले आहे. अविष्का फर्नांडो, सदिरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस आणि जेनिथ लियानागे या खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. वानिंदू हसरंगा आणि महेश तिक्षीना या स्टार फिरकीपटूंनाही स्थान देण्यात आले आहे.

श्रीलंकाविरुद्ध वनडे सामन्यासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.

भारत विरुद्ध वनडे सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ : चारिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदिरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, झेनिथ लियानागे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालागे, चमिका करुणारत्ने, महेश तिक्शिना, अकिंशाना.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :

  • पहिला वनडे सामना, 2 ऑगस्ट, दुपारी 2.30 वाजता, कोलंबो

  • दुसरा वनडे सामना, 4 ऑगस्ट, दुपारी 2.30 वाजता, कोलंबो

  • तिसरा वनडे सामना, 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता, कोलंबो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Wardha: मराठीतून भाषणाला सुरुवात...काँग्रेसने SC,ST,OBC यांना पुढं जाऊ दिलं नाही, PM मोदी वर्ध्यात काय म्हणाले?

IND vs BAN, 1st test: भारताला धक्का! मोहम्मद सिराजला सामना सुरू असतानाच सोडावं लागलं मैदान, जाणून काय झालं

इचलकरंजीत 'जर्मनी गँग'ची दहशत; नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, वाहनांची तोडफोड

आग अन् किटाळ! भारतीय गोलंदाजाच्या वेगवान माऱ्याने स्टम्प्स उखडून फेकले; फलंदाज सैरभैर झाले, Video

Latest Marathi News Updates : अमेरिकेत फेलोशिपसाठी आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची नियुक्ती; भारतातून निवड झालेल्या ठरल्या एकमेव अधिकारी

SCROLL FOR NEXT