suryakumar yadav esakal
क्रिकेट

Ranji Trophy 2024: भारताचा कर्णधार मुंबईच्या रणजी संघातून खेळणार; महाराष्ट्रविरुद्ध मैदानात उतरणार

सकाळ डिजिटल टीम

Suryakumar Yadav in Ranji Trophy : इराणी कप २०२४ विजेता मुंबई संघ मुंबई रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. गतविजेता मुंबई संघ १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्राविरुद्ध दुसऱ्या फेरीचा साखळी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारताचा ट्वेंटी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबई संघाकडून खेळणार आहे. तर इराणी कप स्पर्धेमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या सर्फराज खानला रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघामधून वगळण्यात आले आहे.

सुर्यकुमार रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यासाठी उपलब्ध असेल. असे त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA)कळवले आहे.

मुंबई संघ उद्यापासून (११ ऑक्टोबर) बडोद्याविरुद्ध पहिला रणजी सामना खेळणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार १८ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात सुर्या मुंबई संघाचा भाग असेल.

सूर्यकुमार यादव सध्या बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. ज्यामध्ये यजमान भारताने २-० ने मालिकेत आघाडी घेतली आहे. भारतीय संघ १२ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे.

बांगलादेश मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताचे नेतृत्व करेल. सुर्याला कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता फार कमी आहे. बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेतील संघ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही खेळलेल अशी शक्यता आहे.

सुर्या सध्या भारतीय ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार असून हार्दिक पांड्यानंतर तो ट्वेंटी-२० संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. २०२७ मधील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करताना पहायला मिळेल.

नुकत्याच झालेल्या इराणी कप स्पर्धेमध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने २७ वर्षानंतर विजेतेपद पटकावले. मुंबईच्या या विक्रमीय विजयामुळे एमसीएकडून संघाला १ कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT