Suryakumar Yadav get warning by BCCI Hardik Pandya sakal
क्रिकेट

Captain Suryakumar Yadav : कर्णधारपद मिळेल, पण...! सूर्यकुमार यादवला BCCI ने दिला इशारा; हार्दिकचा चेहरा खुलला

Swadesh Ghanekar

mSuryakumar Yadav get warning - भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० व वन डे मालिकेसाठीच्या संघाची लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याच्या मार्गदर्शनाखाली भारताचा हा पहिलाच दौरा असणार आहे. त्यामुळे गौतम संघ निवडीकडे बारकाईने लक्ष देऊन आहे. गौतमच्या हट्टाखातर बीसीसीआय ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावर सूर्यकुमार यादवला निवडण्यासाठी तयार झाले आहे. पण, त्याचवेळी त्यांनी Mr 360 ला वॉर्निंग दिली आहे. ज्याने हार्दिक पांड्याचा ( Hardik Pandya) चेहरा खुलला आहे.

गौतम गंभीरचा २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून पाहायचे आहे. रोहित शर्माने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हार्दिकचे नाव कर्णधारपदासाठी आघाडीवर होते. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तो संघाचा उप कर्णधार होता आणि त्याआधीच्या काही मालिकांमध्ये त्याने रोहितच्या गैरहजेरीत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती.

वर्क लोड आणि फिटनेस हे कारण पुढे करत हार्दिकला ट्वेंटी-२० कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ नये, असा सूर बैठकीत आवळला गेला. त्यामुळेच २०२६ ला होणाऱ्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आतापासून सुरुवात झाली आहे. त्यामुळेच एकच कर्णधार असावा अशी गौतमची इच्छा आहे.

सूर्यकुमार यादवला इशारा

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीवर परिणाम झाला, तर त्याच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली जाईल, असा इशारा बीसीसीआयने दिला आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने बीसीसीआयला स्पष्ट केले आहे की, श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत तो टीम इंडियाचे नेतृत्व करेल.

सूर्याची कर्णधार म्हणून कामगिरी

सूर्यकुमारने आतापर्यंत एकूण ७ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे आणि त्यापैकी ५ सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सूर्याने भारताचे नेतृत्व केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT