Suryakumar Yadav with Wife Devisha Sakal
क्रिकेट

Suryakumar Yadav: "तू भारतासाठी खेळायला सुरुवात केली, तेव्हा आपण...", सूर्यासाठी पत्नीची भावूक पोस्ट

Suryakumar Yadav’s wife Devisha Post: आगामी श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले असून याबाबत त्याची पत्नी देविशाने खास पोस्ट केली आहे.

Pranali Kodre

Suryakumar Yadav’s wife Devisha on his T20I Captaincy: भारतीय संघाची आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी (१८ जुलै) घोषणा करण्यात आली आहे. या श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला ३ टी२० आणि ३ वनडे सामने खेळायचे आहेत.

दरम्यान, ही संघनिवड करताना भारताच्या टी२० संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवला नियुक्त करण्यात आले. याबाबत त्याची पत्नी देविशाने एक खास मेसेज लिहिला आहे.

सूर्यकुमारने शुक्रवारी टी२० कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर एक पोस्ट शेअर केली होती.

ही पोस्ट देविशाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना त्यावर लिहिले की 'जेव्हा तू भारतासाठी खेळायला सुरुवात केलीस, तेव्हा आपण हा दिवस येईल ही कल्पनाही केली नव्हती. पण ईश्वर महान आहे आणि प्रत्येकाला मेहनतीचं फळ मिळत. तू इतक्या दूरपर्यंत आलाय, तुझा खूप अभिमान वाटत आहे. पण ही तुझ्या लीगसीची फक्त सुरुवात आहे, अजून खूप दूर जायचे आहे.'

Suryakumar Wife post

दरम्यान, सूर्यकुमारने २०२१ साली वयाच्या २९ व्या वर्षी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो सध्या टी२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

त्याने भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व मिळाल्याबद्दल पोस्ट केली, ज्यात लिहिले, 'तुम्ही दिलेल्या प्रेम, पाठिंबा आणि शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार. मागील काही आठवडे स्वप्नवत होते आणि मी खरंच कृतज्ञ आहे. देशासाठी खेळणे ही भावना खूप खास आहे, ज्याचे वर्णन शब्दात वर्णन करता येणार नाही.'

'मला मिळालेली नवी भूमिका आपल्यासोबत मोठी जबाबदारी आणि उत्साह घेऊन आली आहे. मला यापुढेही तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळतील अशी आशा आहे. ईश्वर महान आहे.'

सूर्यकुमार यादवला २०२६ टी२० वर्ल्ड कपपर्यंत टी२० संघाचे नेतृत्वपद देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तसेच शुभमन गिलकडे आता वनडे आणि टी२० संघाचे उप-कर्णधारपद देण्यात आले आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ

  • वनडे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

  • टी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT