Tilal Varma | Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024 Sakal
क्रिकेट

T20 Emerging Teams Asia Cup: तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पाकिस्तानला भिडणार! जाणून घ्या भारताचं वेळापत्रक

T20 Emerging Teams Asia Cup India Schedule: १८ ऑक्टोबरपासून ओमानमध्ये एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धा सुरु होत असून या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धीही आमने-सामने असणार आहेत.

Pranali Kodre

India A vs Pakistan A Match Date and Time: ओमानमध्ये टी२० एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धा खेळवली जाणार आहे. १८ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा अ संघ सहभागी होणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय निवड समितीने भारत अ संघाची घोषणा केली आहे.

या स्पर्धेसाठी भारत अ संघाचे कर्णधारपद युवा तिलक वर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे. तिलक वर्माने गेल्या काही काळात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने देशांतर्गत आणि आयपीएलमध्येही आपल्या खेळानं प्रभावित केलं आहे.

आता टी२० एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना १९ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेत भारतच नाही, तर श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या एकूण ५ देशांचे अ संघ खेळणार आहेत. त्याचबरोबर संयुक्त अरब अमिराती (UAE), हाँग काँग आणि ओमान या तीन संघांचे मुख्य राष्ट्रीय संघ सहभागी होणार आहेत.

दोन ग्रुपमध्ये साखळी फेरी

आधी साखळी फेरी खेळवण्यात येणार आहे. यासाठी या आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून भारत अ संघ बी ग्रुपमध्ये आहे. भारतासह या ग्रुपमध्ये युएई, ओमान आणि पाकिस्तान अ संघ आहेत, तर ए ग्रुपमध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्या अ संघांसह हाँग काँगचा समावेश आहे.

साखळी फेरीतील सामन्यांनंतर दोन्ही ग्रुपमध्ये प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने २५ ऑक्टोबर रोजी होतील. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी अंतिम सामना होईल.

भारताचे सामने

बांगलादेश अ विरुद्ध हाँग काँग सामन्याने या स्पर्धेला १८ ऑक्टोबर रोजी सुरुवात होईल. भारतीय अ संघ पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळल्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी युएईविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. त्यानंतर तिसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी भारतीय अ संघ ओमानविरुद्ध खेळेले. जर भारताने उपांत्य फेरीत धडक मारली. तर २५ ऑक्टोबरलाही भारतीय संघ खेळताना दिसेल.

भारतीय अ संघाचं वेळापत्रक

  • १९ ऑक्टोबर - भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ (वेळ - संध्या. ७ वा.)

  • २१ ऑक्टोबर - भारत अ विरुद्ध युएई (वेळ - संध्या. ७ वा.)

  • २३ ऑक्टोबर - भारत अ विरुद्ध ओमान (वेळ - संध्या. ७ वा.)

उपांत्य आणि अंतिम सामना

  • २५ ऑक्टोबर - पहिला उपांत्य सामना - (वेळ - दु. २.३० वा.)

  • २५ ऑक्टोबर - दुसरा उपांत्य सामना - (वेळ - संध्या. ७ वा.)

  • २७ ऑक्टोबर - अंतिम सामना (वेळ - संध्या. ७ वा.)

भारतीय अ संघ -

तिलक वर्मा (कर्णधार), अनुज रावत, आकिब खान, अभिषेक शर्मा, प्रभ सिमरन सिंग, वैभव अरोरा, आयुष बडोनी, नेहल वढेरा, रसिख सलाम, निशांत सिंधू, अंशुल कंभोज, साई किशोर, रमनदीप सिंग, हृतिक शोकीन,राहुल चाहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT