T20 World Cup sakal
क्रिकेट

T20 World Cup : सुपर आठ फेरीसाठी स्कॉटलंडला;ऑस्ट्रेलियावर विजय आवश्यक

माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करून ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर आठ फेरी गाठण्याचे आव्हान स्कॉटलंडसमोर आहे. ब गटातून पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांची स्पर्धा गतविजेत्या इंग्लंडशी आहे.

सकाळ वृत्तसेवा

सेंट लुसिया : माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करून ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर आठ फेरी गाठण्याचे आव्हान स्कॉटलंडसमोर आहे. ब गटातून पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांची स्पर्धा गतविजेत्या इंग्लंडशी आहे. ऑस्ट्रेलियाने अगोदर सुपर आठ फेरी गाठलेली असल्यामुळे त्यांच्यासाठी स्कॉटलंडविरुद्धचा हा सामना सराव सामन्यासारखाच आहे. तर स्कॉटलंडचे तीन सामन्यांतून पाच तर इंग्लंडचे तीन सामन्यांतून तीन गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना गमावला आणि इंग्लंडने त्यांचा अखेरचा साखळी सामना जिंकला तर दोघांचे प्रत्येकी पाच गुण होतील, त्यावेळी निव्वळ सरासरी विचारात घेतली जाईल आणि आत्ताच्या स्थितीत इंग्लंड स्कॉटलंडपेक्षा बरेच पुढे आहे.

इंग्लंडने ओमानविरुद्धचा सामना अतिशय मोठ्या फरकाने चार षटकांच्या आतच जिंकून आपली निव्वळ सरासरी +३.०८१ एवढी केली आहे. स्कॉटलंडचा इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला, त्यामुळे दोघांना प्रत्येकी एक गुण मिळाला होता. त्यानंतर स्कॉटलंडने नामिबिया आणि ओमान संघांवर विजय मिळवले. साखळीत ते अपराजित असले तरी उद्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मात्र विजय मिळवणे त्यांच्यासाठी सोपे नसेल.

सुपर आठमधील प्रवेश निश्चित असल्यामुळे ऑस्ट्रेलिया उद्याच्या सामन्यात काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन राखीव खेळाडूंना सामन्याचा सराव असावा म्हणून संधी देऊ शकतात, तरीही त्यांची ताकद कमी होणार नाही, मात्र या स्पर्धेत कोणताही संघ कोणालाही पराभवाचा धक्का देऊ शकतो किंवा काही सामने तर अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीचे झाले आहेत. खेळपट्ट्या संथ असल्यामुळे कोणालाही विजय गृहीत धरणे धोक्याचे झाले आहे. स्कॉटलंडचा संघ याच विचाराने उद्याच्या सामन्यात उतरेल.

पाकसाठी अखेरचा सामना

उद्या पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात फ्लोरिडा येथे सामना होत आहे. पाकिस्तानचा हा अखेरचा साखळी सामना आहे. हा सामना जिंकून मलमपट्टी करण्याचा त्यांनी विचार केला असला तरी आयर्लंडकडे धक्कादायक विजय मिळवण्याची क्षमता आहे. आयर्लंडने तीनपैकी दोन सामने गमावले आहेत, त्यामुळे ते पहिल्या विजयासाठी झोकून देतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT