T20 World Cup 2024 Anand Mahindra Post on Hardik Pandya T20 World Cup Emotional Photo 
क्रिकेट

Hardik Pandya: पांड्याचा रडका चेहरा पाहून आनंद महिंद्रा झाले भावूक, म्हणाले...

भारताचा विजय होताच पांड्याच्या डोळ्यांना अक्षरश: पाण्याची धार लागली

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर होता. अन् आता टी 20 वर्ल्ड कपमधील त्याच्या अफलातून कामगिरीमुळं पांड्या पुन्हा सर्वांच्या नजरेत हिरो बनला आहे. या हिरोसाठी भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी खास पोस्ट केली आहे. जी सध्या चर्चेत आली आहे. (T20 World Cup 2024 Anand Mahindra Post on Hardik Pandya T20 World Cup Emotional Photo)

शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. यावेळी हार्दिक पांड्या टीम इंडियाचा तारणहार ठरला. हार्दिकने शेवटच्या ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला अन् मैदानातच त्याला अश्रु अनावर झाले.

पांड्याच्या डोळ्यांना अक्षरश: पाण्याची धार लागली. बराच काळ तो मैदानात रडत होता. त्याचा हाच रडतानाचा फोटो आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करताना आनंद महिंद्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत?

काय आहे ट्विट?

हा तोच चेहरा आहे ज्याला काही दिवसांपूर्वी मैदानावर चिडवले जात होते. सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात होती, त्याचा हा चेहरा आहे. विजयानंतर त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. जेव्हा हा फोटो काढण्यात आला तेव्हा तो T20WorldCupFinal च्या शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करून आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावून तो पुन्हा हिरो बनला होता. त्याचा चेहरा हेच शिकवतो की, जीवनात कोणीही तुम्हाला थप्पड मारली आणि तुम्हाला खाली पाडले तर तुम्ही पुन्हा उभे राहू शकता आणि पुन्हा हिरो बनू शकता! हे माझ्यासाठी #MondayMotivation आहे.

त्यांची ही हार्दिकबद्दलची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. मुंबई इंडियन्स संघाला पाच जेतेपदं मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून बाजूला केल्याने हार्दिकला मैदानात, सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. याचदरम्यान त्याच्या घटस्फोटाची चर्चा रंगली. पण हार्दिकने आपलं मत कशावरही व्यक्त केलं नाही.

विजयानंतर पांड्याने मनात साचलेलं बोलून दाखवलं

गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात जे जे घडलं ते पाहता हा विजय माझ्यासाठी विलक्षण असा आहे. मी कशाबद्दलही एक अक्षरही बोललो नाही. माझ्यावर अन्याय झाला. पण मला माहिती होतं की माझा दिवस येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT