T20 World Cup 2024 Receives Terror Threat News Marathi sakal
क्रिकेट

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

Terror Threat on T20 World Cup 2024 : 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. मात्र, याआधीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Receives Terror Threat: 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. मात्र, याआधीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

आता टी-20 वर्ल्ड कपवर दहशतवादी हल्ल्याचे संकट निर्माण झाले आहे. ही धमकी पाकिस्तानकडून आली आहे. मात्र, यादरम्यान क्रिकेट वेस्ट इंडिजने पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.

1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होणार असून अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. या स्पर्धेत एकूण 55 सामने होणार असून त्यात 40 गट सामने होतील आणि त्यानंतर सुपर 8 सामने आयोजित केले जातील. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित केली जात आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, उत्तर पाकिस्तानमध्ये असलेल्या आयएस-खोरासानकडून वर्ल्ड कपदरम्यान कॅरेबियन देशांना लक्ष्य करण्याचा धोका आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने टी-20 वर्ल्ड कपसह जगभरातील मोठ्या स्पर्धांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.

कॅरेबियन मीडियानुसार, आयएसच्या मीडिया ग्रुप 'नशीर पाकिस्तान'च्या माध्यमातून वर्ल्ड कपला संभाव्य धोक्याची गुप्तचर माहिती मिळाली होती.

तर क्रिकेट वेस्ट इंडिजने सुरक्षेचे पूर्ण आश्वासन दिले आहे. बोर्डाचे सीईओ जॉनी ग्रेव्हज यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले, आम्ही यजमान देश आणि शहरांच्या सतत संपर्कात आहोत आणि प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही कसून नियोजन करत आहोत जेणेकरून कोणत्याही संभाव्य धोक्याचा सामना करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT