Pakistan T20 WC 2024 Squad  esakal
क्रिकेट

Pakistan T20 WC Squad : पाकिस्तानचा संघ जाहीर! विराटची आवडती शिकार हारिस रऊफचे कमबॅक

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 Pakistan Squad : पाकिस्तानने अखेर आपला टी 20 वर्ल्डकप 2024 साठीचा 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला. या संघात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफने पुनरागमन केलं आहे. तो खांद्याच्या दुखापतीनंतर संघात परतला आहे. संघाचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे.

अखेरीस, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ हा एकमेव उरलेला संघ होता ज्याने या मेगा-इव्हेंटसाठी आपल्या खेळाडूंचे नाव दिली नव्हते. यूएसए आणि वेस्ट इंडिज मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी अपेक्षेप्रमाणे बाबर आझम पाकिस्तानचे नेतृत्व करेल. दरम्यान, संघाचा उपकर्णधार कोण असेल याबाबत स्पष्टता नाही.

या संघात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफने पुनरागमन केले आहे. तो फेब्रुवारी महिन्यापासून संघापासून दूर होता. त्याने पाकिस्तानकडून शेवटचा टी 20 सामना हा 19 जानेवारीला खेळला होता. संघात सलमान अली आगा, हसन अली आणि मोहम्मद इरफान यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

टी 20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ :

बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरीस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT