T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट

T20 World Cup 2024: भारतीय पाठीराख्यांचा उत्साह; क्रिकेटसाठी सगळे सहन करणार

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : दुरून दिसायला चांगले असले तरी न्यूयॉर्कला क्रिकेट सामना बघायला यायला प्रेक्षकांना चांगलीच तारांबळ करायला लागत आहे. मुख्य शहरापासून ६० किलोमीटर दूर असलेल्या नव्या कोऱ्‍या स्टेडियमच्या जागी पोहोचायला पहिला प्रवास ट्रेनचा करावा लागतो.

त्यानंतर वेस्टबरी स्टेशनला उतरून चालत कमीतकमी २०-२५ मिनिटे चालत जावे लागते, तेव्हा स्टेडियमच्या आवारात पोहोचता येते. मग आपल्या तिकिटाप्रमाणे जागेवर जायला अजून १५ मिनिटे लागतात. क्रिकेटच्या प्रेमापोटी प्रेक्षक या सगळ्या गोष्टी हसत हसत सहन करतात आणि आपल्या लाडक्या खेळाडूंना प्रत्यक्ष मैदानात खेळताना बघायला आटापिटा करतात.

सामना आणि निकाल दोन्ही मनात

भारतीय क्रिकेट संघाचा आयर्लंड समोरचा पहिला सामना मैदानात अनुभवायला आलेल्या प्रेक्षकांच्या चेहऱ्‍यावरचा उत्साह बरेच काही सांगून जात होता. सामन्याअगोदर जितकी चर्चा खेळाची होताना कानावर आली तितकीच ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्याचीही होती. झाले ते चांगलेच झाले... सगळ्यांना आपणच जिंकलो असल्याचे समाधान देणारा हा निकाल होता, वॉशिंग्टनला राहणाऱ्या संग्राम देशमुखने बोलकी प्रतिक्रिया दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT