T20 World Cup 2024 Wasim Jaffer Team India Squad  esakal
क्रिकेट

T20 World Cup 2024 : चहल-सॅमसनला मिळाली टी 20 वर्ल्डकप संघात संधी; मात्र भारताच्या माजी सलामीवीरानं 'या' स्टार खेळाडूला दाखवला कट्टा

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 Wasim Jaffer Team India Squad : वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणारा टी 20 वर्ल्डकप अवघ्या महिन्यावर आला आहे. एक जूनपासून टी 20 वर्ल्डकप 2024 ची सुरूवात होईल. यापूर्वी सर्व देशांनी आपला 15 खेळाडूंचा संघ 1 मे पूर्वी घोषित करायचा आहे. त्यामुळे भारतात आयपीएलसोबतच संघ निवडीची लगबग देखील सुरू झाली आहे.

अनेक दिग्गज खेळाडू आपापली टीम निवडत आहेत. भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने देखील त्याचा टी 20 वर्ल्डकपमधील भारतीय संघ कसा असेल हे सांगितलं. त्यानं संजू सॅमसनला आपल्या संघात स्थान दिलं आहे.

वसिम जाफरच्या संघात कोण कोण?

वसिम जाफरने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ कसा असायला पाहिजे हे सांगितलं. त्यानं आपल्या संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांची निवड केली. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीवर जाफरनं विश्वास दाशवला आहे. तर चौथा क्रमांक सूर्यकुमार यादवला देण्यात आला आहे.

जाफरने पंत-सॅमसनची केली निवड

वसिम जाफरने भारतीय संघात दोन विकेटकिपर निवडले आहेत. आयपीएल 2024 मध्ये हे दोन्ही विकेटकिपर धुमाकूळ घालत आहेत. संजू सॅमसन आणि पुनरागमन करणारा ऋषभ पंत या दोघांनाही जाफरने आपल्या संघात स्थान दिलं.

यंदाच्या हंगामात सॅमसनची कामगिरी जबरदस्त झाली आहे. जाफरने रिंकू सिंहला आपल्या संघात स्थान दिलं. जाफरने विकेटकिपर म्हणून केएल राहुल आणि इशान किशन या दोन स्टार खेळाडूंना स्थान दिलं नाही.

तीन अष्टपैलूंची निवड

जाफरने आपल्या संघात तीन अष्टपैलू खेळाडूंची निवड केली आहे. शिवम दुबे, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या तीन खेळाडूंना जाफरनं संघात स्थान दिलं. दुबेनं यंदाच्या हंगामात धावांचा पाऊप पडला आहे. त्याने एकट्याच्या जीवावर सीएसकेला सामने जिंकून दिले आहेत.

युझवेंद्र चहललाही संधी

गोलंदाजी विभागात जाफरने जसप्रीत बुमार, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग या जीन वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहेत. तर फिरकीपटूंमध्ये युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीवर विश्वास दाखवला आहे.

जाफरचा टी 20 वर्ल्डकप 2024 चा भारतीय संघ :

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत. संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT