Kirti Azad On T20 World Cup 2024 : आता टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरु होण्यासाठी अवघे काही महिने उरले आहेत. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचा थरार 2 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये रंगणार आहे.
पण अलीकडेच अशा बातम्या आल्या होत्या की, विराट कोहलीला 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या भारतीय संघातून वगळले जाऊ शकते. या संदर्भात 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा खेळाडू आणि तृणमूल काँग्रेस (TMC) नेते कीर्ती आझाद यांनी रविवारी 17 मार्च रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांच्यावर मोठा आरोप केला आहे. तो म्हणाला की, जय शाहला विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर काढायचे आहे.
कीर्ती आझाद याने X वर (पूर्वीचे ट्विटर) म्हणाले, “जय शाह निवडकर्ता नाही. विराट कोहलीला टी-20 संघात स्थान मिळणार नाही हे इतर निवडकर्त्यांशी बोलून त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी अजित आगरकरला का दिली? त्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, अजित आगरकर ना स्वतःला पटवून देऊ शकले ना इतर निवडकर्त्यांना. जय शाहने रोहित शर्मालाही विचारले, पण रोहित म्हणाला की आम्हाला कोणत्याही किंमतीत विराट कोहली हवा आहे. विराट कोहली टी-20 वर्ल्ड कप खेळणार असून संघ निवडीपूर्वी त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.
विराट कोहलीने यावर्षी अफगाणिस्तान विरुद्ध मालिकेदरम्यान टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने जवळपास 14 महिन्यांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 2023 हे वर्ष कोहलीसाठी चांगले गेले होते. त्याने 2023 मध्ये भारतासाठी एकूण 35 सामने खेळले आणि 2048 धावा केल्या, ज्यात 8 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 2023 च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
जर आपण कीर्ती आझादबद्दल बोलायचे झाले तर, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 1983 चा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तो देखील त्या संघाचा एक भाग होता. कीर्तीने भारतासाठी 7 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये कीर्तीने 135 धावा केल्या आणि 3 विकेट घेतल्या. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कीर्तीच्या नावावर 269 धावा आणि 7 विकेट आहेत. कीर्ती सध्या ममता बॅनर्जी यांच्या पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात काम करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.