Team India T20 World Cup eSakal
क्रिकेट

Team India T20 WC 2024: टीम इंडियाचे आणखी 3 खेळाडू अमेरिकेला रवाना; उपकर्णधार पांड्याबाबत वाढला सस्पेंस

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Team India Update: आयपीएलचा रोमांच संपला, आता क्रिकेट विश्वाला वेध लागले आहेत ते टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे. वेस्ट इंडीज आणि अमेरिका या देशांत संयुक्तपणे नववी वर्ल्ड कप स्पर्धा येत्या १-२ तारखेपासून सुरू होत आहे. १-२ अशा दोन तारखांचा उल्लेख दोन्ही देशांमधील प्रमाणवेळेमुळे करण्यात आला आहे. अमेरिकेत सलामीची लढत १ जून रोजी सायंकाळी सुरू होईल, त्यावेळी भारतात २ जूनची सकाळ झालेली असेल.

टी-20 वर्ल्ज कपसाठी संघ अमेरिकेत पोहोचले आहेत. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील अनेक खेळाडू पहिल्या बॅचमध्ये अमेरिकेला पोहोचले आहेत. दुसरीकडे आयपीएल आणि वैयक्तिक कामामुळे काही खेळाडू अमेरिकेला पोहोचले नाहीत. आता हळूहळू इतर खेळाडूही न्यूयॉर्कला पोहोचत आहेत. सोमवारी आणखी तीन खेळाडू अमेरिकेला रवाना झाले.

या खेळाडूंमध्ये युजवेंद्र चहल, यशस्वी जैस्वाल आणि आवेश खान यांचा समावेश आहे. आयपीएल प्लेऑफमुळे हे खेळाडू टीम इंडियाच्या पहिल्या बॅचसोबत गेले नव्हते. आतापर्यंत अमेरिकेत पोहोचलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार रोहित शर्मा तसेच यष्टिरक्षक ऋषभ पंत, शुभमन गिल, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंचा समावेश आहे. आता यात युजवेंद्र चहल, यशस्वी जैस्वाल आणि आवेश खान देखील सामील झाले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या न्यूयॉर्कला पोहोचला आहे. आयपीएलनंतर तो परदेशात सुट्टी घालवत होता. मात्र, त्याचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ समोर आलेला नाही. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये त्याच्या आगमनावर सस्पेंस निर्माण झाला आहे. बीसीसीआयनेही त्याच्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.

चार दिवसांपूर्वी हार्दिकने त्याच्या इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ पोस्ट केले होते. ज्यामध्ये तो स्विमिंग पूलमध्ये दिसला होता. आता टीम इंडियाच्या सराव सत्रासाठी तो अमेरिकेला पोहोचल्याचे बोलले जात आहे. विराट कोहलीनेही बीसीसीआयकडून ब्रेक मागितला होता. तो नंतर न्यूयॉर्कला पोहोचेल. रिंकू सिंग बुधवारी अमेरिकेला जाणार आहे. केकेआरने आयपीएल जिंकल्यानंतर त्याने स्वतः हे अपडेट दिले होते.

संजू सॅमसन अद्याप अमेरिकेला पोहोचलेला नाही. काही वैयक्तिक कामानिमित्त तो सध्या दुबईत आहेत. टीम इंडिया 1 जूनला अमेरिकेत सराव सामना खेळणार आहे. याआधी न्यूयॉर्कमध्ये सराव सत्रे होतील. भारतीय संघाचा वर्ल्ड कपतील पहिला सामना ५ जून रोजी अमेरिकेशी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ते' वक्तव्य भोवलं! काळे झेंडे दाखवत राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्याला भाजपचा तीव्र विरोध, पोलिस-कार्यकर्त्यांत झटापट

Latest Marathi News Live Updates : माजी आमदार सिताराम घनदाट घेणार शरद पवारांची भेट

Team India semi-Final scenario: भारतीय संघ पहिलाच सामना हरला, उपांत्य फेरीचा मार्ग अवघड झाला; पाकिस्तानचा संघ पुढे गेला...

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’साठी भावांनी मागितली माफी,योजनेसाठी बनावट अर्ज केल्याने सहा जणांची चाैकशी

Sharad Pawar: आयाराम वाढवणार पवारांच टेंशन; या निष्ठावान नेत्याने दिला बंडखोरीचा इशारा

SCROLL FOR NEXT