Suryakumar Yadav SAKAL
क्रिकेट

Suryakumar Yadav : 'वेगळं बनण्याचा प्रयत्न करू नका...' कप्तान बनल्यावर सूर्याने का दिला होता सहकऱ्यांना सल्ला, जुना Video Viral

India squad for Sri Lanka Tour : श्रीलंका दौऱ्यासाठी संघनिवड अखेर जाहीर करण्यात आली. हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादव टी-२० मालिकेसाठी कर्णधार करण्यात आला आहे....

Kiran Mahanavar

India squad for Sri Lanka Tour : श्रीलंका दौऱ्यासाठी संघनिवड अखेर जाहीर करण्यात आली. हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादव टी-२० मालिकेसाठी कर्णधार करण्यात आला आहे; तर एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पुनरागमन केले आहे. हार्दिकच्या फिटनेस समस्येमुळे बीसीसीआयने नवा कर्णधार निवडण्यास प्रवृत्त केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान सूर्याला सर्वात लहान फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला.

स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडियावर क्लिप शेअर केली, ज्यामध्ये सूर्यकुमारने त्याच्या कर्णधार कौशल्याबद्दल सांगितले. व्हिडिओ 2023 मधला आहे, जेव्हा सूर्याने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 असा विजय मिळवून दिला आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली.

तो म्हणाला, 'मी या नव्या भूमिकेचा आनंद घेत आहे. मी सर्वांसोबत वेळ घालवत आहे आणि आम्ही सर्वांनी खूप फ्रँचायझी किंवा राज्य क्रिकेट खेळले आहे, त्यामुळे त्यांची ताकद आणि कमकुवतपणा माहित आहे. आम्ही मैदानाबाहेरही बराच वेळ घालवतो, त्यामुळे मैदानावर चांगली मदत होते.

पुढे तो म्हणाला की, मला गोष्टी सोप्या ठेवायला आवडतात आणि मी प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला सांगतो की गोष्टी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप काही करण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःला वेगळे दिसण्याचा प्रयत्न करू नका.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

भारतीय एकदिवसीय मालिकेसाठी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT