ICC Women’s T20 World Cup 2024 : आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्याही संघाने अधिकृतपणे अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केलेले नसले तरी उपांत्य फेरीचं चित्र आता स्पष्ट होत चाललं आहे. ऑस्ट्रेलियाने काल ९ विकेट्स राखून पाकिस्तानवर विजय मिळवताना उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचवेळी त्यांनी भारतीय संघाची मदत केलेली आहे, परंतु हरमनप्रीत कौर अँड टीमच्या मार्गात कांगारूंचाच अडथळा आहे.
एलिसा हिलीचा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातोय, परंतु काही खेळाडूंच्या फिटनेसच्या समस्येने त्यांना सतावले आहे. सहावेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने अ गटातील ३ सामने जिंकून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यांना बाहेर करायचे असल्यास भारताकडून त्यांचा दारूण पराभव आणि न्यूझीलंडचे दोन मोठे विजय आवश्यक आहे.
भारतीय संघाने आशिया चषक विजेत्या श्रीलंकेला पराभूत करून उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारताने चांगले पुनरागमन केले. श्रीलंकेला नमवून हरमनप्रीत कौर अँड टीमने नेट रनरेटमध्ये प्रचंड सुधारणा केली आहे. आता त्यांना शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागेल. नाहीतर इतरांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.
न्यूझीलंडने वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवात दणक्यात केली,परंतु पुढच्या सामन्यात त्यांची हार झाली. त्यामुळे त्यांना उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. ऑस्ट्रेलियाकडून ६० धावांनी हरल्यामुळे न्यूझीलंडचा नेट रनरेटही पडला आहे.
पाकिस्तानला ३ सामन्यांत १ विजय मिळवता आला आहे आणि त्यांचे आव्हान संपल्यात जमा आहे. भारत शेवटच्या साखळी सामन्यात पराभूत झाला आणि न्यूझीलंडने उर्वरित सामने गमावले तर पाकिस्तानला संधी आहे. त्यासाठी त्यांना साखळी गटातील शवेटची लढत जिंकावी लागेल आणि तेव्हा नेट रनरेट निर्णायक ठरेल.
श्रीलंकेचे आव्हान संपलेच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.