Team India unlikely to travel to Pakistan for 2025 Champions Trophy Sakal
क्रिकेट

ICC Champions Trophy: येत नाही जा! BCCI चा पाकिस्तानात जाण्यास नकार; ICC ला दिले दोन देशांचे पर्याय

Indian Cricket team is unlikely to travel to Pakistan: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघाचे पुढील लक्ष्य हे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे आहे, पण...

सकाळ डिजिटल टीम

Indian Cricket team is unlikely to travel to Pakistan: भारतीय संघाने रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली नुकताच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आणि आयसीसी स्पर्धेतील ११ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. आता भारतीय संघ पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी सज्ज होत आहे आणि गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल अशी सर्वांना आशा आहे. पण, या ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का? हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आता मिळाले आहे. BCCI ने भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्याच्या त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 

पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत खेळवली जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यासाठी तयारीही सुरूर केली आहे आणि त्यांनी ICC कडे वेळापत्रकाचा ड्राफ्टही पाठवला आहे. त्यानुसार भारतीय संघाचे सर्व सामने त्यांनी लाहोर येथे खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

India vs Pakistan यांच्यातील लढत १ मार्च २०२५ रोजी होणार असल्याचे वृत्त आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असतील आणि त्यांच्यासोबत न्यूझीलंड व बांगलादेश असतील. दुसऱ्या गटात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असल्याचा अंदाज आहे.

भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नसल्याचे BCCI च्या सूत्राने ANI ला सांगितले आहे. आशिया चषक स्पर्धेच्या वेळेस हाच प्रश्न उद्भवला होता आणि त्यावेळी बीसीसीआयचा हायब्रिड मॉडेल मान्य केला गेला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आकांडतांडव करूनही काहीच उपयोग झाला नव्हता. हीच परिस्थिती चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसतेय... 

दोन्ही देशांतील राजकीय संबंध पाहता टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही आणि त्यामुळे BCCI ने त्यांचे सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळवण्याचा प्रस्ताव ICC ला दिला आहे. बीसीसीआयचे क्रिकेटमधील वर्चस्व पाहता तो मान्य केला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT