IND vs BAN 1st Test day 3 esakal
क्रिकेट

IND vs BAN : जसप्रीत बुमराह OUT, इशान किशन IN; KL Rahul चं काय? दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात दिसतील बदल

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत ५१५ धावांचे आव्हान उभं करून बांगलादेशला पराभवाच्या छायेत ढकलले आहे. आर अश्विन, शुभमन गिल व ऋषभ पंत यांनी शतकी खेळी करून दुसऱ्या कसोटीसाठी संघातील स्थान पक्के केले आहे. रवींदद्र जडेजा व यशस्वी जैस्वाल यांनीही चांगली कामगिरी केली आहे. पण, काही खेळाडूंच्या कामगिरीने चिंता नक्की वाढवली आहे आणि त्यामुळेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुसऱ्या कसोटीपूर्वी काही बदल करेल अशी अपेक्षा आहे.

IND vs BAN यांच्यातला दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळवण्यात येणार आहे. पहिली कसोटी खिशात टाकल्यात जमा असल्याने कानपूरसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात बदल पाहायला मिळू शकतात. दोन सामन्यांच्या मालिकेसाठी BCCI ने फक्त पहिल्या कसोटीसाठीच संघ जाहीर केला होता. दुलीप ट्रॉफीतील काही खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समिती लक्ष ठेऊन आहे आणि त्यामुळे संघात बदल अपेक्षित आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर विश्रांतीवरून जसप्रीत बुमराह मैदानावर उतरला आणि त्याने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या आहेत. पण, आगामी महत्त्वाच्या मालिका लक्षात घेता बुमराहला दुसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते. भारताला न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वाची कसोटी मालिका खेळायची आहे. कानपूरचं मैदान गाजवण्यासाठी भारताकडे तीन फिरकीपटूंचा पर्याय उपलब्ध आहे.

इशान किशनने बूची बाबू आणि दुलीप ट्रॉफीत शतक झळकावून निवड समितीचे लक्ष वेधले आहे. ध्रुव जुरेल व सर्फराज खान हे दोन खेळाडू संघात आहेत. जर यशस्वी जैस्वाल किंवा रोहित शर्मा यांना विश्रांती दिली गेली, तर इशानला ओपनर म्हणून संधी मिळू शकते. विराट कोहली व लोकेश राहुल यांचा फॉर्म बीसीसीआयची डोकेदुखी वाढवतोय. राहुलला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी आणखी एक संधी दिली जाऊ शकते.

भारताचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संभाव्य संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, यश दयाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

Dharavi: 5 हजार जणांचा जमाव; भडकाऊ पोस्ट व्हायरल अन् गर्दीत बाहेरचे लोक, धारावी मशीद प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

SCROLL FOR NEXT