Team India Squad Change For 4th Test Jasprit Bumrah Rested Who Is Vice Captian marathi news sakal
क्रिकेट

Ind vs Eng : बुमराह बाहेर गेला पण टेन्शन वाढलं! आता 'ही' जबाबदारी रोहितसोबत कोणाच्या खांद्यावर?

Team India Squad Change For 4th Test Jasprit Bumrah Rested : इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा उपकर्णधार होता, पण आता त्याला विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे ही जबाबदारी कोण पार पाडणार हा मोठा प्रश्न आहे.

Kiran Mahanavar

India vs England 4th Test : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी बीसीसीआयने संघात पुन्हा काही बदल केले आहेत. जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तिन्ही सामन्यांमध्ये त्याला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु आता तो बाहेर पडल्याने बीसीसीआयच्या बाजूने कोणालाही उपकर्णधार करण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्मासह चौथ्या सामन्यात उपकर्णधार कोण असेल, हा प्रश्न पडला आहे.

जसप्रीत बुमराहला 23 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील रांची कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. शेवटच्या सामन्यात तो पुन्हा पुनरागमन करू शकतो. केएल राहुल या सामन्यातून बाहेर पडला आहे, तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.

मालिकेतील शेवटचा सामना तो खेळताना दिसण्याची शक्यता आहे. एक बदल असाही आहे की, जो संघात आधीच होता पण मधल्या काळात रणजी ट्रॉफी खेळायला गेलेला मुकेश कुमार आता पुन्हा संघात सामील झाला आहे. पण चौथ्या कसोटीसाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात उपकर्णधार म्हणून कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही.

आता उपकर्णधारपदाची जबाबदारी कोण पार पाडणार?

पहिल्या तीन सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत होता. मैदानाबाहेर प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यासोबत रणनीती बनवणे. कर्णधाराला मैदानावर काही सल्ला हवा असल्यास त्याला पाठिंबा देणे ही उपकर्णधाराची जबाबदारी असते. त्याचबरोबर कर्णधाराने काही काळ मैदान सोडले तर त्याच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही उपकर्णधार बघतो. आता पुढच्या सामन्यात असे काही झाले तर हे काम कोण करणार?

रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना कोणाला तरी ही जबाबदारी दिल्या जाऊ शकते. अश्विन आणि जडेजा हे दोघेही आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांचे कर्णधार राहिले आहेत. रवींद्र जडेजाने टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणूनही काम केले आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित अडचणीत आल्यास या दोघांपैकी कोणीतरी त्याला साथ देण्याची शक्यता आहे. पण बीसीसीआयने संघात उपकर्णधार म्हणून कोणाचीही घोषणा केलेली नाही.

चौथ्या कसोटीसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT