Team India young player shares photo funny caption remember rohit sharma sakal
क्रिकेट

टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन रोहितची भीती? आता फिरण्यासाठी गार्डन नव्हे तर शोधले 'हे' नवे ठिकाण

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा नुकताच संपला. दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. टीम इंडियाने ही मालिका 4-1 ने जिंकली. या दौऱ्यावरून परतताना ध्रुव जुरेलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत.

Kiran Mahanavar

आपण भारतीय कर्णधार रोहित शर्माला त्याच्या मजेदार शैलीसाठी ओळखतो. पण कधी-कधी तो मैदानात खेळाडूंवर रागावतानाही दिसला आहे. इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान रोहित शर्माने युवा खेळाडूंना इशारा दिला होता की, गार्डनमध्ये कोणी फिरकणार नाही. त्याचा हा आवाज स्टंप माईकमध्ये टिपला गेला आणि त्याची जोरदार चर्चा झाली.

मात्र, हिटमॅनचा स्वभाव खेळाडूंनाही माहीत आहे की, त्याचा राग फक्त मैदानापुरता असतो, मैदानाबाहेर तो खूप भारी माणूस आहे. अशा परिस्थितीत आता यंग ब्रिगेडनी गार्डनमध्ये न फिरता, दुसरा उपाय शोधला आहे.

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा नुकताच संपला. दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. टीम इंडियाने ही मालिका 4-1 ने जिंकली. या दौऱ्यावरून परतताना ध्रुव जुरेलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये जुरेलसोबत अभिषेक शर्मा, खलील अहमद, रवी बिश्नोई आणि आवेश खान देखील आहेत. हे सर्व खेळाडू विमानतळावर बसलेले दिसतात.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये जुरेलने लिहिले की, गार्डनमध्ये जायला नाही सांगितले म्हणुन विमानतळावर हँग आउट करायला आलो. खरंतर, ज्युरेल इंग्लंड मालिकेत टीम इंडियाचा एक भाग होता, म्हणून त्याने रोहितच्या इशाऱ्याचा समाचार घेत हे कॅप्शन लिहिले आहे, जे चाहत्यांना खूप आवडले.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतली होती. अशा परिस्थितीत झिम्बाब्वे मालिकेसाठी शुबमन गिलकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट होती. पहिल्याच सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी युवा खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत सलग 4 सामने जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT