Kane Williamson, Tom Latham, Tim Southee Sakal
क्रिकेट

IND vs NZ, Test: भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडने बदलला कॅप्टन! टीम साऊदी अचानक कर्णधारपदावरून पायउतार

Pranali Kodre

Tom Latham appointed full-time New Zealand Test Captain: न्यूझीलंड संघ आता या महिन्यात म्हणेज ऑक्टोबरच्या मध्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंडला भारताविरुद्ध १६ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, त्यापूर्वीच न्यूझीलंडला कर्णधार बदलावा लागला आहे.

वेगवान गोलंदाज टीम साऊदीने न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तो केन विलियम्सनने कसोटी संघाचे नेतृत्व २०२२ मध्ये सोडल्यानंतर साऊदी ही जबाबदारी सांभाळत होता.

मात्र नुकतेच श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर साऊदीने कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याचा निर्णय जाही केला आहे. त्याने हा निर्णय संघहितासाठी घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता न्यूझीलंडने यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथमकडे पूर्णवेळ कर्णधारपद सोपवले आहे.

लॅथमने यापूर्वी ९ कसोटी सामन्यांमध्ये प्रभारी कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पण आता त्याच्याकडे नियमित कर्णधार म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी भारत दौऱ्यावरही लॅथमच न्यूझीलंडचे कर्णधारपद सांभाळताना दिसू शकतो. येत्या काही दिवसात भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा होणार आहे.

कर्णधारपद सोडताना साऊदी म्हणाला, 'न्यूझीलंडचे कसोटीमध्ये नेतृत्व करणे माझ्यासाठी विशेष होते. ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मी नेहमीत माझ्या कारकि‍र्दीत संघाला अधिक प्राधान्य दिले आहे. मला खात्री आहे मी घेतलेला निर्णय संघाच्या हितासाठी आहे.'

'माझा विश्वास आहे की मैदानातील कामगिरीने, विकेट्स घेण्यासाठी माझे सर्वोत्तम देण्यातून आणि न्यूझीलंडला सामने जिंकून देण्यासाठीच योगदान देऊनच मी संघाची सर्वोत्तम सेवा करू शकतो.'

साऊदी पुढे म्हणाला, 'मी नेहमीप्रमाणेच माझ्या संघसहकाऱ्यांना पाठिंबा देत राहिल, विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर येत असलेल्या गोलंदाजांना. मी टॉमला या जबाबदारीसाठी शुभेच्छा देतो. त्याला मी मदतीला असेल, हे त्याला माहित आहे.'

साऊदीला मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ स्कॉट विनिंक यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. साऊदीने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही स्पष्ट केले. तसेच त्याने याबाबत स्टेड यांच्याशीही चर्चा केली होती.

टीम साऊदीने १४ कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले आहे, ज्यात ६ सामन्यांत विजय, तर ६ सामन्यांत पराभव पत्करले आहेत. तसेच २ सामने अनिर्णित राहिले आहेत. साऊदीने १०२ कसोटी सामने खेळताना ३८२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच २११५ धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: महायुतीत एकनाथ शिंदेच वरचढ! कोकणात लढवणार सर्वाधिक जागा? भाजप, राष्ट्रवादीला फक्त 'इतक्या' जागा

Haryana Election : हरियानातील हॅट्रिकनंतर भाजपचं खास सेलिब्रेशन! राहुल गांधींना पाठवली खास भेट

Latest Maharashtra News Updates : विदर्भातील 11 जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?

Share Market Opening: शेअर बाजार हिरव्या रंगात उघडले; निफ्टी 25,000च्या वर, कच्च्या तेलात मोठी घसरण

Mumbai High Court: खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत काय केले? महामुंबईतील पालिकांना न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT