Hardik Pandya | India vs Bangladesh, 2nd T20I Sakal
क्रिकेट

IND vs BAN, Video: एकच नंबर! हार्दिकने बाऊंड्री लाईनजवळ घेतला भारी कॅच; रोहित-विराटच्या पंक्तीतही मिळवलं स्थान

Pranali Kodre

India vs Bangaldesh, 2nd T20I: भारतीय संघाची गेल्या काही वर्षापासून क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी करत आहे. वेळोवेळी याचा प्रत्येय देखील येतो. भारतीय खेळाडूंनी अनेक अफलातून झेलही गेल्या काही सामन्यांमध्ये घेतलेत. असाच एक झेल आता हार्दिक पांड्याकडूनही बुधवारी (६ ऑक्टोबर) पाहायला मिळाला.

बुधवारी भारत आणि बांगलादेश संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना दिल्लीमध्ये पार पडला. सामन्यात हार्दिक पांड्याने तीन झेल घेतले. त्यामुळे त्याने एक विक्रमही केला. दरम्यान, या तीन झेलांपैकी त्याने १४ व्या षटकात रिशाद हुसैनचा घेतलेल्या झेलाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले.

भारताने बांगलादेशसमोर २२२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा फलंदाजी कोलमडली होती. तरी एका बाजूने मेहमुद्दलाह झुंज देत होता. त्याला साथ देण्यासाठी आठव्या क्रमांकावर रिशाद हुसैन उतरला.

मात्र १४ व्या षटकात वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला उतरला. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर रिशादने लाँग-ऑनला मोठा फटका खेळला. त्यावर चेंडू सीमापारच जाईल असं वाटत होतं. पण हार्दिक पांड्या डीप मिड-विकेटपासून पळत आला आणि त्याने पळतच अफलातून झेल घेतला. त्यामुळे रिशादला ९ धावांवरच माघारी परतावे लागले.

त्याआधी हार्दिकने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोचाही झेल घेतला होता. तसेच त्याने नंतर तांझिम हसन साकिबचाही झेल घेतला. त्यामुळे त्याच्या आता आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५२ झेल झाले आहेत.

विराट-रोहितच्या पंक्तीत हार्दिक

हार्दिकने क्षेत्ररक्षक म्हणून १०४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये हे ५२ झेल घेतले आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० हून अधिक झेल घेणारा भारताचा तिसराच क्षेत्ररक्षक आहे.

त्याच्याआधी असा कारनामा फक्त रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाच करता आला आहे. रोहितने १५९ सामन्यांमध्ये ६५ झेल घेतले आहेत, तर विराटने १२५ सामन्यांमध्ये ५४ झेल घेतले आहेत.

दरम्यान, बुधवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर हार्दिकने फक्त क्षेत्ररक्षणातच नाही, तर फलंदाजीतही त्याने १९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ३२ धावांची छोटेखानी, पण महत्त्वाची खेळी केली. या सामन्यात भारताने २० षटकात ९ बाद २२१ धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशला २० षटकात ९ बाद १३५ धावाच करता आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT