Virat Kohli Sakal
क्रिकेट

Virat Kohli: बघ, कसं वादळ आलंय..., जेव्हा विराट पत्नी अनुष्काला दाखवतो बार्बाडोसमधील वातावरण

सकाळ डिजिटल टीम

Virat Kohli Viral Video: 29 जून रोजी तब्बल 17 वर्षानंतर भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला. भारतीय टीम बार्बाडोसमध्ये काही काळ अडकली होती. त्यामुळे खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबावं लागलं होतं.

यावेळेस भारताचा फलंदाज विराट कोहली बार्बाडोसमधील वातावरण पत्नी अनुष्का शर्माला दाखवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

विराट कोहलीची पत्नी त्याच्यासोबत बार्बाडोसमध्ये आलेली नव्हती. त्यामुळे फायनल जिंकल्यानंतरही विराट त्याच्या कुटुंबीयांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसला होता.

अशा परिस्थितीत आता कोहलीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो अनुष्का शर्माला व्हिडिओ कॉलवर बार्बाडोसचे भयानक वातावरण दाखवत होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता तो भारतीय संघाकडून फक्त एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

विराटसोबतच रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनीही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराट कोहलीने भारतासाठी 125 टी-20 सामन्यांमध्ये 137 च्या स्ट्राइक रेटने 4188 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 38 अर्धशतकेही झळकली आहेत.

फायनलमधील महत्त्वाची खेळी

संपूर्ण टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीची बॅट शांत राहिली. पण फायनलमध्ये त्याने महत्त्वाची खेळी खेळली. भारताने 50 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. मात्र, विराटने एक बाजू सांभाळत महत्त्वाची खेळी केली.

त्याने 59 चेंडूंचा सामना करत 76 धावांची अप्रतिम खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकारही मारले. विराटला या खेळीसाठी सामनावीर पुरस्कारही देण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हौस ऑफ बांबू : अभिजाताचे श्रेय कुणाला..?

योग निद्रा : मन अन् शरीरस्वास्थ्याची अनुभूती

गायत्री ध्यान

विज्ञानवाटा : शास्त्रज्ञांनी साकारले तलम सुवर्णपान

‘आहाराकडे जास्त लक्ष आवश्यक’

SCROLL FOR NEXT