Virat Kohli on Rohit Sharma sakal
क्रिकेट

Team India: 'विराट-रोहितची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण भारताकडे....', टीम इंडियाचे माजी बॅटिंग कोच काय म्हणाले?

Pranali Kodre

Vikram Rathour on transition process in Team India: भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे आता हे खेळाडू केवळ वनडे आणि कसोटीत खेळताना दिसणार आहेत.

एकूणच भारतीय संघ आता संक्रमणाच्या काळातून जात आहे. याबाबत आता भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी भाष्य केलं आहे.

पीटीआयशी बोलताना विक्रम राठोड म्हणाले, 'विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंची जागा घेणं सोपं असणार नाही. पण अजूनही कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये तिथं पोहण्यासाठी आपल्याकडे काही वर्षे आहेत.'

विक्रम राठोड यांच्यामते भारतात अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत, पण व्यवस्थापनाने समतोल राखत चांगल्या पद्धतीने हे संक्रमण घडवायला हवे.

ते म्हणाले, 'मला याबाबत फारशी चिंता नाही. भारतीय क्रिकेटमध्ये खूप सखोलता आहे. अनेक कौशल्यपूर्ण आणि प्रतिभाशाली खेळाडू समोर येत आहेत. आपल्याला फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी की हे बदल नियंत्रित असावेत आणि हळुहळू करण्याची गरज आहे.'

याशिवाय त्यांनी असंही सांगितले की असे काही खेळाडू आहेत, जे भविष्यात वनडे आणि कसोटीतही आपली जागा पक्की करू शकतात.

'येणाऱ्या काही वर्षात मला आशा आहे की शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल असे काही खेळाडू आहे, जे स्वत:ला सिद्ध करतील आणि या बदलांना सोपं करतील. वनडेतही श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या असे काही अनुभवी खेळाडू आपल्याकडे आहेत.'

याशिवाय ज्याप्रमाणे रोहित-विराट यांनी क्रिकेटविश्व गाजवले, तसे जयस्वाल आणि गिलही गाजवू शकतात अशी आशा विक्रम राठोड यांनी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, 'असे अनेक खेळाडू आहे, ज्यांना पाहाणे औत्सुक्याचे असेल, पण हे दोन खेळाडू दीर्घकाळ तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळू शकतात. ते येणाऱ्या काळात भारतीय फलंदाजीचा कणा बनतील.'

विक्रम राठोड यांनी रिंकु सिंगचेही कौतुक केले. ते म्हणाले, 'जेव्हा मी त्याला नेटमध्ये फलंदाजी करताना पाहातो, तेव्हा मला तो कसोटीतही का यशस्वी बनू शकत नाही, याचं कोणतंही तांत्रिक कारण दिसत नाही.'

'टी२० क्रिकेटमध्ये त्यानं त्याचं नाव एक उत्तम फिनिशर म्हणून बनवलंय, पण तुम्ही त्याचे प्रथम श्रेणीमधील रेकॉर्ड्सही पाहिले, तर त्याची सरासरी ५० च्या आसपास आहे. त्याचबरोबर तो शांत राहू शकतो. यातून हेच दिसतं की त्याला जर संधी दिली, तर तो एक चांगला कसोटी क्रिकेटपटू बनू शकतो.'

विक्रम राठोड यांचाही कार्यकाळ टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर संपला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT