Virat Kohli Delhi’s Ranji Trophy probable list
भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली रणजी करंडक स्पर्धेत खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेने रणजी करंडक स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत विराटचे नाव आहे. २०१९-२० नंतर प्रथमच विराटचं नाव रणजी करंडक स्पर्धेच्या संभाव्य संघात दिसले आहे. या महिन्याच्या सुरुवातील भारताच्या माजी कर्णधाराला दुलीप ट्रॉफीत खेळण्यापासून विश्रांती दिली गेली होती. बीसीसीआयला तो दुखापतग्रस्त होईल अशी भीती होती. भारतीय संघाला पुढील काही महिन्यांत सतत क्रिकेट खेळायचे आहे आणि त्यामुळे कदाचित विराट रणजी करंडक २०२४-२५ च्या पर्वातील पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. ११ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे.
भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी कानपूर येथे दाखल झाला आहे. २७ सप्टेंबरपासून ही कसोटी सुरू होणार आहे आणि त्यानंतर कसोटी संघातील खेळाडूंना दोन आठवड्यांची विश्रांती असेल. भारताला १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पुढील कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा तीन सामन्यांत मुकाबला करायचा आहे. रणजी करंडक स्पर्धेचा पहिला लेग १६ नोव्हेंबरला संपेल.
न्यूझीलंडविरुद्धची मालिका ५ नोव्हंबरला संपेल आणि त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर Border Gavaskar Trophy साठी रवाना होईल. २२ नोव्हेंबरपासून ही ५ सामन्यांची मालिका सुरु होईल. त्यामुळे विराट कोहली दिल्लीकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमीच आहे. विराटसह दिल्लीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये ऋषभ पंत, हर्षित राणा यांचे नाव आहे. इशांत शर्माचे नाव मात्र वगळले गेले आहे.
विराट कोहली, ऋषभ पंत, हिम्मत सिंग, प्रांशु विजयन, अनिरुद्ध चौधरी, क्षितिज शर्मा, वैभव कंदपाल, सिद्धांत बन्सल, समर्थ सेठ, जॉन्टी सिद्धू, सिद्धांत शर्मा, तिशांत डबला, नवदीप सैनी, हर्ष त्यागी, लक्ष्य सुमित थरेजा, शिवांक वशिष्ठ, सलील मल्होत्रा, आयुष बडोनी, गगन वत्स, राहुल एस डागर, हृतिक शोकीन, मयंक रावत, अनुज रावत ( यष्टिरक्षक) , सिमरजीत सिंग, शिवम कुमार त्रिपाठी, कुलदीप यादव, ललित यादव, प्रिन्स चौधरी, शिवम किशोर कुमार, शिवम किशोर कुमार गुप्ता (यष्टिरक्षक), वैभव शर्मा, जितेश सिंग, रोहित यादव, सुमित कुमार, अनमोल शर्मा, केशव डबा, सनत संगवान, शुभम शर्मा (यष्टिरक्षक), आर्यन चौधरी, आर्यन राणा, भगवान सिंग, प्रणव राजवंशी (यष्टिरक्षक), सौरव डागर, मनी ग्रेवाल, कुंवर बिधुरी, निखिल सांगवान, पुनीत चहल, प्रियांश आर्य, यश धुल, प्रिन्स यादव, हर्षित राणा, मयंक यादव, सुयश शर्मा, अर्पित राणा, दिविज मेहरा, सुजल सिंग, हार्दिक शर्मा, हिमांशू चौहान, आयुष डोसेजा, अंकित राजेश. कुमार, ध्रुव कौशिक, अंकुर कौशिक, क्रिश यादव, वंश बेदी, यश सेहरावत, विकास सोलंकी, राजेश शर्मा, तेजस्वी दहिया (यष्टिरक्षक), रौनक वाघेला, मनप्रीत सिंग, राहुल गहलोत, आर्यन सेहरावत, शिवम शर्मा, सिद्धार्थ शर्मा, परव सिंगला, योगेश सिंग, दीपेश बालियान, सागर तन्वर, ऋषभ राणा, अखिल चौधरी, दिग्वेश राठी, सार्थक रंजन, अजय गुलिया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.