Virat Kohli Meet Childhood Coach : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्डकप 2024 चे विजेतेपद पटकावणारे भारतीय क्रिकेट गुरुवारी ट्रॉफीसह देशात परतले. बार्बाडोसमधील वादळामुळे खेळाडूंना भारतात येण्यास उशीर झाला.
4 जून रोजी सकाळी भारतीय खेळाडू दिल्लीत उतरले आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी परेडमध्ये भाग घेतला. त्यानंतर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, विराट कोहलीने त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांची भेट घेतली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
आयसीसी टी-20 वर्ल्डकप विजय साजरा करण्यासाठी भारतीय संघाच्या भव्य विक्ट्री परेडनंतर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांची भेट घेतली. राजकुमार म्हणाले की, विराटसोबत पहिल्यांदा क्रिकेटचा सराव करण्यापासून ते या खेळातील सर्वात मोठा स्टार बनण्यापर्यंत विराटने नेहमीच त्याचा अभिमान बाळगला आहे.
टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसला. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात त्याने कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय खेळी खेळली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास मदत केली. विराट कोहलीने अंतिम सामन्यात 59 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या होत्या. या स्पर्धेदरम्यान त्याने सात डावात केवळ 75 धावा केल्या.
या फलंदाजाने टी-२० वर्ल्डकपात आठ डावात 18.87 च्या सरासरीने आणि 112.68 च्या स्ट्राईक रेटने 151 धावा केल्या, त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. अंतिम सामना जिंकल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.