Virat Kohli vs Gautam Gambhir sakal
क्रिकेट

Virat Kohli vs Gautam Gambhir : गौतमसोबत वाद अन् आता सोबत काम! विराट कोहलीनं BCCI ला स्पष्टच सांगितले

Virat Kohli vs Gautam Gambhir : भारतीय क्रिकेटमध्ये आता गौतम गंभीर पर्व सुरू झाले आहे, पण विराट कोहली त्याच्या मार्गदर्शाखाली खेळणार का?

Swadesh Ghanekar

Virat Kohli vs Gautam Gambhir : भारतीय क्रिकेटमध्ये आता गौतम गंभीर पर्व सुरू झाले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने पदभार सोडला. त्यानंतर BCCI ने गौतमकडे ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, व विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केल्यामुळे गौतमचे काम आधिच हकले झाले होते. पण, तरीही सीनियर्सना वगळून नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संधी देण्याचा गौतमचा कल कायम आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी व जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा लक्षात घेता, सीनियर्सना एकाऐकी बसवून चालणार नाही, हेही गौतमला माहित आहेच.

गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य कोच झाल्याने विराट व रोहितला डील करण्याचं मोठं आव्हान त्याच्यासमोर असेल. रोहित सर्वांमध्ये मिसळणारा असल्यााने गौतमसाठी तो डोकेदुखी निर्माण करणारा नक्कीच नाही. पण, विराटचा विचार केल्यास, गौतमसोबत उडालेले खटके याची चिंता बीसीसीआयला नक्की सतावत होतीच. त्यात आात गौतमच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यात गौतम व विराट एका वेगळ्या भूमिकेत एकमेकांसमोर येणार आहेत. त्याआधीच BCCI ने विराटशी चर्चा करून सुवर्णमध्य शोधला आहे.

गंभीर विरुद्ध विराट राडा!

गौतम व विराट हे दोघंही दिल्लीचे आहेत आणि त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरील आक्रमकता ही त्यांच्या अंगी उपजतच आहे. आयपीएल २०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या लढतीत विराट व गौतम यांच्यात शाब्दिक राडा झाला होता. त्यानंतर दोघांवर बीसीसीआयने दंडात्मक कारवाईही केली होती. पण, आयपीएल २०२४ मध्ये दोघांमधील विस्तव विझल्याचे चित्रही दिसले होते.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दोन वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळणाऱ्या विराट व गौतम यांच्यात किती मोठं भांडण झालेलं, हे सर्वांनी पाहिलं. आता त्याच गौतमचं टीम इंडियाकडून खेळताना विराटला ऐकावं लागणार आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार विराटाने गौतमसोबत काम करण्यास कोणतीच अडचण नसल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. गौतमसोबतच्या पूर्वीच्या वादाचा टीम इंडियाकडून खेळताना व्यावसायिक कामात कोणताच अडथळा येणार नाही, अशा शब्द विराटने BCCI ला दिल्याचे कळतेय.

गौतमच्या रणनीतीशी विराटने सहमती दर्शवताना सुट्टी लवकर संपवून श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळण्याची तयारी दाखवली आहे. या मालिकेसाठी गौतमने रोहित, विराट व जसप्रीत बुमराह या सीनियर्सना खेळण्याची विनंती केली होती. विराट व रोहीतने ती मान्य केली, परंतु जसप्रीतने सुट्टी वाढवली आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचे संघ

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

भारताचा ट्वेंटी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT