भारतीय क्रिकेट संघाची कॅप मिळवणे हे देशातील कोणत्याही खेळाडूचे सर्वात मोठे स्वप्न असते. मात्र, वरिष्ठ भारतीय संघाकडून खेळणे जितके कठीण आहे, तितकेच संघातील स्थान टिकवणेही कठीण आहे. अनेक क्रिकेटपटूंनी हे केले आहे आणि दीर्घकाळ संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले, परंतु काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर स्वत:ला सिद्ध केले, परंतु ते जास्त काळ वरिष्ठ भारतीय संघात खेळू शकले नाहीत.
मनोज तिवारी हा देखील अशा क्रिकेटपटूंपैकी एक आहे, ज्या जवळपास दोन दशके बंगाल क्रिकेटकडून खेळला आणि भारतासाठी 12 एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळले. रणजी ट्रॉफीमध्ये बंगालच्या अंतिम सामन्याच्या एका दिवसानंतर रविवारी हा खेळाडू निवृत्त झाला.
मनोज तिवारीने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 11 डिसेंबर 2011 रोजी चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले एकदिवसीय शतक झळकावले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. जुलै 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्ध तो संघाचा भाग नव्हता आणि त्याला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले.
आता निवृत्तीच्या एका दिवसानंतर मनोजने त्याला संघातून वगळण्याबाबत आणि त्याच्या कारकिर्दीच्या समाप्तीबद्दल एक मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करूनही त्याला कसोटी कॅप मिळू शकली नाही याची खंत आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मनोज म्हणाला की, मी जेव्हा 65 प्रथम श्रेणी सामने खेळलो तेव्हा माझी फलंदाजीची सरासरी 65 च्या आसपास होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला आणि चेन्नईतील मैत्रीपूर्ण सामन्यात मी 130 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात मी 93 धावा केल्या. मी कसोटी कॅप मिळवण्याच्या अगदी जवळ होतो, पण त्यांनी माझ्याऐवजी युवराज सिंगची निवड केली. त्यामुळे टेस्ट कॅप मिळू शकली नाही. एवढेच नाही तर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
पुढे तो म्हणाला की, मी जेव्ह खेळत होतो तेव्हा एमएस धोनी कर्णधार होता. त्यामुळे मला संधी का मिळली नाही हे महेंद्रसिंग धोनीकडून ऐकायला नक्कीच आवडेल. शतक झळकावल्यानंतर मला संघातून का वगळण्यात आले, विशेषत: त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जेथे कोणीही धावा काढत नव्हते, ना विराट कोहली, रोहित शर्मा आणि ना सुरेश रैना.... माझ्याकडे आता गमावण्यासारखे काही नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.