virat kohli esakal
क्रिकेट

IPL 2025 मध्ये विराट कोहलीच्या पगारात होणार वाढ; जाणून घ्या सविस्तर माहिती

IPL Retention New Rule: बीसीसीआयने रिटेंशनबाबत जाहीर केलेल्या नियमांनुसार फ्रँचायझीना आता ६ खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी तब्बल ७९ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

IPL 2025 Retention : आगामी आयपीएल हंगामासाठी बीसीसीआयने नवीन रिटेंशन नियम जाहीर केले आहेत. नव्या रिटेंशन नियांनुसार फ्रँचायझीना खेळाडूंना संघात कायम ठेवण्यासाठी आता जास्त किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विराट कोहलीच्या आयपीएल पगारात वाढ होणार आहे.

रिटेंशनबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी फ्रँचायझींना ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे. नवीन आयपीएल रिटेंशन नियमांनुसार, फ्रँचायझींना रिटेन होणाऱ्या पहिल्या खेळाडूला १८ कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूला १४ कोटी रुपये आणि तिसऱ्या खेळाडूला ११ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ज्यामुळे विराट कोहली, रिषभ पंतसारख्या फ्रँचायझींकडून संघात कायम ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.

विराट कोहलीच्या आयपीएल पगारात वाढ?

विराट कोहली रिटेंशनसाठी आरसीबीची पहिली पसंती असण्याची अपेक्षा आहे. नव्या नियमांनुसार पहिल्या रिटेंशनची रक्कम १८ कोटी करण्यात आली आहे. विराट कोहलीला २०२२ च्या मेगा लिलावापूर्वीच्या १५ कोटी रूपये देवून संघात कायम ठेवण्यात आले होते. आरसीबीने विराटला सर्वात आधी कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यास विराटच्या पगारात २०२२ च्या तुलनेत यावेळी ३ कोटीची वाढ होईल.

आरसीबीकडून रिटेन होणारे ५ संभाव्य खेळाडू

विराट कोहली

रजत पटीदार

मोदम्मद सिराज

यश दयाल

ग्लेन मॅक्सवेल

आयपीअएल रिटेंशन आणि लिलाव

फ्रँचायझीकडे खर्च करण्यासाठी १२० कोटी रुपये असणार आहेत. त्यांना या १२० कोटी रुपयांमध्येच खेळाडूंचे रिटेंशन आणि लिलाव पार पाडायचा आहे. दरम्यान खेळाडू ६ खेळाडूंना एकतर लिलावापूर्वी कायम करू शकतात किंवा राईट टू मॅच कार्ड (RTM) वापरू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT