West Indies announce squad for T20I series against South Africa sakal
क्रिकेट

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kiran Mahanavar

West Indies announce squad for T20I series against South Africa : टी-२० वर्ल्ड कपपूर्वी वेस्ट इंडिजला दक्षिण आफ्रिकेसोबत मालिका खेळायची आहे. ज्यासाठी संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. शाई होप, निकोलस पूरन या मालिकेतून अनेक बड्या खेळाडूंची नावे गायब आहेत.

या मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या नव्या कर्णधाराचीही घोषणा करण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना 20 मे रोजी होणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची कमान ब्रँडन किंगकडे सोपवण्यात आली आहे. ब्रँडन किंग वेस्ट इंडिज संघाचा 13वा टी-20 कर्णधार ठरला आहे.

टी-20 वर्ल्ड कपपूर्वी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेत दोन्ही संघांना आपापल्या तयारीची टेस्ट करण्याची संधी मिळणार आहे. आंद्रे रसेल, निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल आणि शिमरॉन हेटमायर हे खेळाडू या मालिकेत खेळू शकणार नाहीत. बहुतेक खेळाडू सध्या आयपीएल 2024 मध्ये खेळत आहेत आणि त्यांचे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे हे खेळाडू दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेला मुकणार आहेत.

मालिका आणि वर्ल्ड कपमध्ये वेगवेगळे कर्णधार

2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजचा संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये संघाची कमान रोव्हमन पॉवेलकडे आहे आणि आता ब्रँडन किंगला टी-20 मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. पॉवेल सध्या आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळत आहे, आणि त्याचा संघ प्लेऑफसाठीही पात्र झाला आहे, त्यामुळे ते वेस्ट इंडिज संघात सहभागी होऊ शकणार नाही.

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ - ब्रँडन किंग (कर्णधार), रोस्टन चेस, ॲलेक अथानाझ, जॉन्सन चार्ल्स, आंद्रे फ्लेचर, मॅथ्यू फोर्ड, जेसन होल्डर, अकेल होसेन, शमर जोसेफ, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, गुडाकेश मोती, रोमॅरियो शेफर्ड, हेडन वॉल्श.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT