Sachin Tendulkar - Ratan Tata 
क्रिकेट

Ratan Tata: तो दिवस नेहमीच लक्षात राहिल... जेव्हा मास्टर-ब्लास्टर सचिनने घेतलेली रतन टाटा यांची भेट

When Sachin Tendulkar Meet Ratan Tata: भारतीय उद्योगाचे महामेरू असलेल्या रतन टाटा यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांची याचवर्षी मे महिन्यात सचिन तेंडुलकरने भेट घेतली होती. त्या भेटीबद्दल सचिन काय म्हणाला होता, जाणून घ्या

Pranali Kodre

Ratan Tata News: भारत देशाला बुधवारी रात्री मोठा धक्का बसला आहे. भारतीय उद्योगाचे महामेरू असलेल्या रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा हे फक्त भारतीय उद्योग क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्त्वच नव्हते, तर ते त्यांच्या नम्र, प्रामाणिक स्वभावासाठी आणि उदारतेसाठीही ओळखले जात होते. त्यांचे श्वानप्रेम तर सर्वश्रुत आहे.

त्यामुळे ते भारतभरातच नाही, जगभरातीलही आदरणीय व्यक्ती होते. त्यांची भेट ही अनेकांसाठी अविस्मरणीय देखील ठरली आहे. भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठीही त्यांची भेट अशीच अविस्मरणीय ठरली होती. याबद्दल त्यानेच सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते. त्याने त्याच्या पोस्टमध्ये रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्वाचेही कौतुक केले होते.

५१ वर्षीय सचिनने याचवर्षी मे महिन्यात रतन टाटा यांची भेट घेण्याची संधी मिळाली होती. त्याने त्यांच्या भेटीदरम्यानचा फोटोही शेअर केला होता.

त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की 'एक संस्मरणीय संभाषण. गेला रविवार माझ्यासाठी अविस्मरणीय होता, कारण मला श्री टाटा यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. आमच्या दोघांनाही ज्याबद्दल प्रेम वाटते त्या ऑटोमोबाईल्सबद्दल, समाजाला परत देण्याची बांधिलकीबद्दल, वन्यजीव आणि श्वान प्रेमाबद्दलच्या गोष्टींबद्दल आम्ही गप्पा मारल्या.'

'असे संभाषण अमुल्य असते आणि आपल्या आयुष्यात आपल्या आवडी-निवडी किती आनंद देऊ शकतात आणि परिणाम करू शकतात, याची आठवण करून देते. या दिवसाच्या आठवणीने नेहमीच माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवेल.'

सचिनच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स आणि लाईक्स आले होते. केवळ सचिनच नाही, तर असे अनेक मोठे सेलिब्रेटी आहेत ज्यांच्याकडे अशा अनेक रतन टाटा यांच्या भेटीच्या आठवणी असून अनेकांनी याबाबत सांगितलेही आहे.

रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू होते. पण त्यांनी बुधवारी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाचा यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म विभूषण पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच अडकून पडले!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT