WPL 2024 Who Is Sajeevan Sajanas : महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. शेटच्या दोन चेंडूवर मुंबईला विजयासाठी 5 धावांची गरज होती. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बाद झाली.
आता खेळपट्टीवर पदार्पण करणारी फलंदाज सजीवन सजना आली होती. मात्र WPL मधील पहिलाच चेंडू खेळणाऱ्या सजीवन सजनाने षटकार मारत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यामुळे दिल्लीच्या तोंडचा घास हिरावला गेला.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट्स गमावून 171 धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात मुंबईने दमदार सुरूवात केली. मुंबई इंडियन्स हा सामना आरामात जिंकणार असे वाटत असतानाच दिल्लीने मुंबईच्या फलंदाजीला वेसन घालण्यास सुरूवात केली. अखेर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता.
मुंबईला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज होती. त्यावेळी क्रीजवर पदार्पणाचा सामना खेळणारी सजना स्ट्राईकवर होती. तिने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत मुंबईला हंगामातील पहिला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
29 वर्षाची सजीवन सजना ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळकडून खेळते. सजना ही फिरकी अष्टपैलू खेळाडू असून तिला पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. मुंबई इंडियन्सने तिला लिलावात 15 लाख रूपये बोली लावून आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं आहे. सजीवन ही अनकॅप्ट खेळाडू असून ती भारतीय अ संघाकडून देखील खेळली आहे.
सजना ही रिक्षा चालकाची मुलगी आहे. केरळमध्ये आलेल्या पुरात सजनाने जवळपास सर्व काही गमावलं होतं. ती मिनू मानीनंतर महिला प्रीमियर लीगमध्ये खेळणारी दुसरी भटक्या विमुक्त जमातीतील दुसरी खेळाडू आहे.
तिने नारळाच्या फांदीपासून तयार केलेल्या बॅटने क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. चोट्टाकाडवू येथे राहणारी सजना ही घराजवळ प्लास्टिक बॉलवर खेळायची. तिला 17 वर्षाची होईपर्यंत महिलांचे देखील क्रिकेट सामने असतात अन् संघ असतो हे माहिती नव्हतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.