India Tour of Australia 2024-25: भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला २२ नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. वैयक्तिक कारणामुळे तो कसोटीत खेळू शकणार नाही, अशी माहिती रोहित शर्माकडून बीसीसीआयला देण्यात आली आहे.
रोहित वैयक्तिक कारणामुळे माघार घेणार आहे, मात्र त्याचे हे काम आधीच झाले, तर मात्र तो पाचही कसोटी सामन्यात खेळू शकणार आहे. अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून याप्रसंगी देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत अभिमन्यू ईस्वरन, शुभमन गिल किंवा केएल राहुल हे खेळाडू सलामीला फलंदाजी करू शकतात.
दरम्यान, जर रोहित शर्मा पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल, तर भारतीय संघाचे नेतृत्व कोणाला मिळू शकते अशीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे यासाठी कोणते पर्याय असू शकतात, हे पाहू.
जसप्रीत बुमराह भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत त्याच्याकडेच नेतृत्वाची जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी त्याने २०२३ मध्ये इंग्लंडविरुद्ध एका कसोटीत नेतृत्वही केले आहे. त्यामुळे त्याला रोहितच्या जागेवर प्रभारी कर्णधारपद मिळू शकते.
बुमराह ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी प्रमुख गोलंदाजांपैकी एक देखील असणार आहे. दरम्यान, जर बुमराहला ही जबाबदारी मिळाली नाही, तर ऋषभ पंत आणि शुभमन गिल हे दोन पर्याय असू शकतात.
शुभमन गिलकडे बीसीसीआय भविष्यातील कर्णधार म्हणून देखील पाहात असल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत कसोटीत नेतृत्व करण्यासाठीही तो प्रबळ दावेदार असेल.
ऋषभ पंतही कसोटी संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. तसेच यष्टीरक्षक हा एक चांगला कर्णधार होऊ शकतो, असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. तसेच तो देखील नेतृत्वासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.