Why Hardik Pandya not Team India Captain T20 Series sakal
क्रिकेट

Hardik Pandya : पांड्यावर अन्याय... गंभीरने हार्दिकला का दिला नाही पाठिंबा? अहवालात मोठा खुलासा

Why Hardik Pandya not Team India Captain T20 Series : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेत संघांचे नेतृत्व करणार आहे, परंतु टी-20 मध्ये हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा होती.

Kiran Mahanavar

Team India Squad for Sri Lanka 2024 : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेत संघांचे नेतृत्व करणार आहे, परंतु टी-20 मध्ये हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा होती. मात्र गौतम गंभीर हे नवे मुख्य प्रशिक्षक बनताच त्यांनी टी-20 संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवले आहे. कर्णधारपद न मिळाल्याने हार्दिकचे चाहते नाराज दिसत आहेत. पांड्याला कर्णधार का करण्यात आले नाही ते समजून घेऊया?

ESPN क्रिकइन्फोच्या म्हणण्यानुसार, फिटनेस आणि कामाचा भार सांभाळण्याच्या चिंतेमुळे कर्णधारपदाचा निर्णय हार्दिकच्या विरोधात गेला. 2023च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. अनेक महिन्यांनंतर त्याने आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन केले. पण हार्दिकची चिंता इथेच संपत नाही, कारण याआधीही तो दुखापतींमुळे टूर्नामेंट आणि मालिकेला मुकला आहे.

हार्दिक पांड्याला सध्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद मिळणे कठीण दिसत आहे. त्याला टी-20 संघांचा पण उपकर्णधारही बनवण्यात आलेले नाही. सूर्यकुमार यादवला टी-20 वर्ल्ड कप 2026 पर्यंत कर्णधारपदावर ठेवलं जाऊ शकतं, असंही दुसऱ्या एका मीडिया रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.

दुसरीकडे, शुभमन गिलला टी-20 मालिकेचा उपकर्णधार बनवणे हे देखील एक संकेत आहे की संघ व्यवस्थापन कोणत्याही परिस्थितीत हार्दिकला प्रमुख भूमिका देऊ इच्छित नाही.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक होता उपकर्णधार

राहुल द्रविड टी-20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कपमध्ये हार्दिकला संघाचा उपकर्णधार करण्यात आले होते. आणि या अष्टपैलू खेळाडूनेही चांगली कामगिरी करून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. पण गौतम गंभीरचा प्लॅन वेगळा आहे कारण श्रीलंका दौऱ्यासाठी ज्या प्रकारचा संघ निवडला गेला आहे, त्यावरून हार्दिकला कर्णधारपदाच्या जवळपास कुठेही येऊ दिले जाणार नाही, असे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT