WI vs SA 3rd T20I | Brandon King | Obed McCoy Sakal
क्रिकेट

WI vs SA: एक कॅच घेण्यासाठी विंडिजचे दोन खेळाडू एकाच वेळी धावले अन् डाईव्हही मारली, पण...; पाहा Video

Pranali Kodre

Cricket Catch Video: दक्षिण आफ्रिका संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून त्यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यांत यजमान वेस्ट इंडिजने 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह वेस्ट इंडिजने 3-0 असा विजय मिळवला.

दरम्यान, तिसऱ्या सामन्यावेळी वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रेंडन किंगने एक शानदार झेल घेतला. पण या झेलावेळी एक नाट्यपूर्ण घटना घडली होती.

झाले असे की या सामन्यात दक्षिण आफ्रिका प्रथम फलंदाजीसाठी उतरले होते. पण त्यांनी 19 षटकातच 155 धावांवर 6 विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी 8 व्या क्रमांकावर जेराल्ड कोएत्झी फलंदाजीला उतरला होता.

मात्र, 20 व्या षटकात शामर जोसेफने दुसरा चेंडू फुलटॉस टाकला, ज्यावर कोएत्झीने मोठा शॉट खेळायचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागला आणि उडाला.

त्यावेळी ब्रेंडन किंग एक्झ्ट्रा कव्हरपासून पळत आला, त्याचवेळी ओबेड मॅकॉयही पळत आला. या दोघेही चेंडूला पाहत पळत होते, त्यामुळे त्यांची धडक होते की काय असेही अनेकांना वाटले. त्या दोघांनीही एकाचवेळी डाईव्हही मारली. पण यावेळी ब्रेंडन किंगने अचूक वेळ साधत चेंडू झेलला. त्यामुळे कोएत्झीला गोल्डन डकवरच माघारी परतावे लागले.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 163 धावा केल्या. त्यांच्याकडून प्रभारी कर्णधार रस्सी वॅन डर द्युसेनने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. तसेच विआन मुल्डरने ३६ धावांची खेळी केली.

वेस्ट इंडिजकडून ओबेड मॅकॉयने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर शामर जोसेफ आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग वेस्ट इंडिजने 13.5 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केला. वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सने सर्वाधिक 69 धावांची खेळी केली. तसेच ब्रेंडन किंगने 44 धावा केल्या, तर काईल मेयर्सने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झी आणि एनक्वाबा पीटर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT