Women's Premier League 2024 esakal
क्रिकेट

Women Premier League : मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय

गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा हा महिला प्रीमियर लीगमधील यंदाच्या मोसमातील सलग दुसरा विजय ठरला, हे विशेष.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर - अमेलिया केर हिची अष्टपैलू चमक... शबनिम इस्माईल हिची प्रभावी गोलंदाजी आणि कर्णधार हरमनप्रीत कौर हिची आणखी एक शानदार खेळी याच जोरावर मुंबई इंडियन्स महिला संघाने गुजरात जायंटस्‌ संघावर पाच विकेट राखून विजय मिळवला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा हा महिला प्रीमियर लीगमधील यंदाच्या मोसमातील सलग दुसरा विजय ठरला, हे विशेष. गुजरात जायंटस्‌ संघाचा हा पहिला पराभव ठरला.

गुजरातकडून मुंबईसमोर १२७ धावांचे आव्हान उभे ठाकले होते. यास्तिका भाटीया व हेली मॅथ्यूज या सलामीवीरांना अपयशाचा सामना करावा लागला. नॅट सिव्हर व हरमनप्रीत कौर या अनुभवी जोडीने मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सिव्हर २२ धावांवर धावचीत बाद झाली.

त्यानंतर हरमनप्रीत व अमेलिया केर या जोडीने मुंबईची अधिक पडझड होऊ नये, याची काळजी घेतली. सलामीच्या लढतीत अर्धशतकी खेळी करून मुंबईला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारी हरमनप्रीत याही लढतीत चमकली. तिने नाबाद ४६ धावांची खेळी केली. अमेलिया हिने ३१ धावा केल्या.

त्याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गुजरातला २० षटकांत ९ बाद १२६ धावांवर रोखण्यात मुंबईला यश लाभले. तनुजा कंवर हिने २८ धावांची, तर केथरीन ब्राईस हिने नाबाद २५ धावांची खेळी केली. मुंबईकडून अमेलिया हिने १७ धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शबनिम इस्माईल हिने तीन फलंदाज बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT