IND W vs SL W esakal
क्रिकेट

INDWvsSLW : भारताची ‘नारी शक्ती’! श्रीलंकेला पराभूत केले; पाकिस्तान, न्यूझीलंडला धक्के बसले, Semi चे गणित मजेशीर झाले

Swadesh Ghanekar

Women’s T20I World Cup 2024 INDW vs SLW Marathi Updates: भारतीय महिला संघाने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला आणि आशिया चषक विजेत्या श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने भारताच्या उपांत्य फेरीच्या आशांना धक्का दिला होता. पण, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने पाकिस्तान व श्रीलंका यांना पराभूत करून उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. भारताने आजच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून नेट रनरेट सुधारण्यासोबतच पाकिस्तान व न्यूझीलंडला धक्का दिला.

स्मृती मानधना ( ५०) आणि हरमनप्रीत कौर ( ५२*) यांच्या अर्धशतकीय खेळीला शफाली वर्माने ( ४३) चांगली साथ दिली. त्याजोरावर भारताने ३ बाद १७२ धावा उभ्या केल्या. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील या सर्वोत्तम धावा ठरल्या. शफाली आणि स्मृती यांनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर हरमनप्रीतने २७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ५२ धावांची वादळी खेळी केली.

रेणुका सिंगने दुसऱ्याच चेंडूवर श्रीलंकेला धक्का दिला. विष्मी गुणारत्नेने उत्तुंग फटका मारला आणि राधा यादवने अविश्वसनीय झेल घेतला. श्रेयंका पाटीलने भारताला हवी ती विकेट मिळवून दिली आणि श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टू ( १) झेलबाद झाली. रेणूकाने आणखी एक धक्का देताना हर्षिता समरविक्रमाला ( ३) माघारी पाठवले. कविशा दिलहारी ( २१) व अनुष्का संजीवनी ( २०) यांनी काही काळ मैदानावर जिद्द दाखवली, परंतु दोघींना अनुक्रमे आशा सोभना आणि अरुद्धंती रेड्डीने बाद केले.

श्रीलंकेचा निम्मा संघ ५७ धावांवर तंबूत परतला. निलाक्षिका सिल्वा ( ८) हिला रेड्डीने बाद केल्यानंतर सोभनाने दोन धक्के दिले. सुगंधिका कुमारी ( १) व इनोशी प्रियदर्शनी ( १) यांनाही अपयश आले. सोभनाने ४-०-१९-३ अशी स्पेल टाकली. रेड्डीने तिच्या चौथ्या षटकात विकेट घेऊन ३ बाद १९ धावा असा स्पेल संपवला. दीप्ती शर्माने शेवटची विकेट घेऊन श्रीलंकेचा डाव ९० धावांवर गुंडाळला आणि भारताने ८२ धावांनी विजय मिळवला.

भारताची भरारी...  

श्रीलंकेला ९० धावांमध्ये रोखल्यामुळे नेट रनरेटमध्ये त्यांनी न्यूझीलंडला मागे टाकले आहे आणि आता भारताचा नेट रनरेट सराकात्मक झाला आहे. भारताने ९० धावांच्या आत श्रीलंकेला गुंडाळले आणि नेट रनरेटमध्ये पाकिस्तानलाही मागे टाकले. भारताचा नेट रन रेट आता ०.५७६ झाला आहे आणि ४ गुणांसह ते दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. पाकिस्तानचा नेट रन रेट ०.५५५ इतका आहे, तर न्यूझीलंडचा रन रेट -०.०५० इतका आहे.

Semi final scenario

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata Passed Away: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास; भारतीय उद्योगाचा महामेरु हरपला

Ratan Tata: सुस्वागतम... मोदींच्या एका मेसेजनंतर रतन टाटांनी नॅनोचा कारखाना गुजरातला कसा नेला?

Ratan Tata Passed Away: टाटांच्या जाण्याने अदानी, अंबानी, महिंद्रा भावुक; भावनांना वाट मोकळी करुन देत वाहिली श्रद्धांजली

Ratan Tata: रतन टाटांची 5 मोठी कामे जी देशातील प्रत्येक नागरिकाला कायम स्मरणात राहतील

Ratan Tata life history : ब्रीच कँडी रुग्णालयातून जेआरडी परतले अन् रतन टाटांना बोलावून घेतलं; 'त्या' सोमवारी घडली ऐतिहासिक घटना

SCROLL FOR NEXT