Shafali Verma | Indian Women Team Sakal
क्रिकेट

Women's Asia Cup 2024: शफालीचे शतक थोडक्यात हुकले, टीम इंडियाचं नेपाळसमोर 179 धावांचं लक्ष्य

India vs Nepal Women: महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने अखेरच्या साखळी सामन्यात नेपाळ समोर 179 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Pranali Kodre

Women's Asia Cup 2024, India vs Nepal: महिला आशिया कप स्पर्धेत मंगळवारी भारत विरुद्ध नेपाळ संघात सामना होत आहे. डंबुला येथे होत असलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळ महिला संघासमोर विजयासाठी १७९ धावांचे आव्हान ठेवले आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने २० षटकात ३ बाद १७८ धावा केल्या. भारताकडून शफली वर्माने दमदार अर्धशतक केले.

पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने नेपाळ विरूद्धच्या तिसऱ्या साखळी सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांती दिली. त्यामुळे या सामन्यात स्मृती मानधना नेतृत्व करत आहे.

या सामन्यान मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ती शफलीबरोबर सलामीला फलंदाजीला आली नाही, तिने तिच्याऐवजी दयालन हेमलताला फलंदाजीला पाठलवले.

शफाली आणि हेमलता यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. यादरम्यान एक बाजू हेमलताने सांभाळलेली असताना शफलीने दुसऱ्या बाजूने वादळी खेळी केली. पण १४ व्या षटकात अर्धशतकाला अवघ्या ३ धावा हव्या असताना हेमलता बाद झाली. तिने ५ चौकार आणि १ षटकारासह ४७ धावा केल्या.

पण शफाली ज्या लयीत खेळत होती, ते पाहाता, ती शतक करेल असे वाटत असतानाच ती १६ व्या षटकात बाद झाली. शफालीने ४८ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारांसह ८१ धावांची खेळी केली.

तिच्यानंतर एस सजनाही १० धावांवर बाद झाली. पण त्यानंतर जेमिमाहने १५ चेंडूत नाबाद २८ धावा केल्या आणि भारताला १७८ धावांपर्यंत पोहचवले. ऋचा घोष ६ धावांवर नाबाद राहिली.

नेपाळकडून गोलंदाजी करताना सिता राणा मगरने २ विकेट्स घेतल्या, तर कबिता जोशीने १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : मुंबईवर कोणी हल्ला केला तर मोदी त्यांना पातळातूनही शोधून काढेन, सोडणार नाही - मोदी

SCROLL FOR NEXT