India vs Sri Lanka Women's Asia Cup Final Sakal
क्रिकेट

Asia Cup सोबत भारतीय महिलांना ६ लाख १८ हजारही गमवावे लागले; जाणून घ्या नेमका ट्विस्ट

Pranali Kodre

Women's Asia Cup 2024 India vs Sri Lanka Final: श्रीलंका महिला संघाने रविवारी मायदेशात आशिया कप जिंकत इतिहास रचला. रविवारी डंबुलाला झालेल्या महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाला ८ विकेट्सने पराभूत केले.

त्यामुळे श्रीलंकेने पहिल्यांदाच महिला आशिया कप स्पर्धेचं विजेतेपद जिंकले. या विजेतेपदानंतर श्रीलंकेला २०, ००० डॉलर म्हणजेच साधारण १६ लाख ४८ हजार रुपये बक्षीस मिळाले.

तसेच उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाला १२, ५०० डॉलर म्हणजेच साधारण १० लाख ३० हजार रुपये मिळाले. एकूणच भारतीय संघाला श्रीलंकेपेक्षा ६ लाख १८ हजार रुपये कमी मिळाले.

तसेच अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या हर्षिता समरविक्रमा हिला १,००० डॉलर (८२ हजार रुपये) मिळाले, तर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या चमारी अट्टापट्टूला २००० डॉलर (१ लाख ६४ हजार रुपये) मिळाले.

श्रीलंकेचा विजय

अंतिम सामन्यात ७ वेळच्या विजेत्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या होत्या. भारताकडून उपकर्णधार स्मृती मानधनाने ४७ चेंडूत ६० धावांची खेळी केली. तसेच ऋचा घोषने ३० धावांची आणि जेमिमाह रोड्रिग्सने २९ धावांची खेळी केली.

श्रीलंकेकडून कविशा दिलहारीने २ विकेट्स घेतल्या, तर उदेशिका प्रबोधनी, सचिनी निसांसाला आणि कर्णधार चमारी अट्टापट्टू यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

त्यानंतर १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग श्रीलंकेने १८.४ षटकात २ विकेट्स गमावत १६७ धावा करत सहज पूर्ण केला. श्रीलंकेकडून हर्षिता सरविक्रमाने ५१ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६९ धावांची नाबाद खेळी केली. तसेच कर्णधार चमारी अट्टापट्टूने ४३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावा केल्या.

भारताकडून एकमेव विकेट दिप्ती शर्माने घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atul Parchure Passed Away: मराठी रंगभूमीवरचा हरहुन्नरी तारा निखळला! अभिनेते अतुल परचुरे यांचे ५७ व्या वर्षी निधन

Bopdev Ghat Case Update: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसरा आरोपी ताब्यात; पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक

India summons Canadian diplomat : निज्जर हत्येप्रकरणी आरोप खपवून घेतले जाणार नाहीत! कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यास भारताचे समन्स

Gunaratn Sadavarte: बिगबॉसमध्ये गेलेल्या सदावर्तेंवर हायकोर्टाची नाराजी! त्यांना गांभीर्यच नसल्याचा ठेवला ठपका

Latest Maharashtra News Live Updates: भाजपच्या पराभूत उमेदवारांना पुन्हा उमेदवारी नाही

SCROLL FOR NEXT